जन्मदाताच ठरला कर्दनकाळ, जळगावात बापाकडून मुलाची हत्या, डोक्यात दगड घालून केला खेळ खल्लास

Last Updated:

Crime in Jalgaon: जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एक पित्याने आपल्या पोटच्या लेकाची निर्घृण हत्या केली आहे.

News18
News18
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी जळगाव: जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एक पित्याने आपल्या पोटच्या लेकाची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी बापाने डोक्यात दगड घालून मुलाचा जीव घेतला आहे. ही हत्या कुणी केली, याबाबत पोलिसांकडे काहीच माहिती नव्हती, मात्र पोलिसांनी अवघ्या आठ तासात गुन्ह्याची उकल केली आहे. या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
ही घटना जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी इथं घडली आहे. येथील मद्यपी मुलाच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या पित्याने मुलाच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. शुभम सुरडकर असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. तर धनराज सुरडकर असं हत्या करणाऱ्या वडिलाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी धनराजचा भाऊ हिरालाल आणि लहान मुलगा गौरव सुरडकर यांनाही अटक केली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम सुरडकर याला दारूचे प्रचंड व्यसन होतं. यामुळे काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी निघून गेली. त्यानंतर शुभम दारू पिऊन घरातील प्रत्येकाशी वाद घालत होता. दरम्यान शुभमच्या त्रासाला कंटाळून शुभमचे वडील धनराज सुरडकर यांनी शुभमच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. यानंतर धनराजने आपला भाऊ आणि लहान मुलाच्या मदतीने शुभमच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. तसेच शुभमचा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हत्या केली, असा बनावही रचण्याचा प्रयत्न केला.
advertisement
मात्र त्यांचा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी अवघ्या 8 तासांत या गुन्ह्याचा छडा लावला. शुभमचे वडील धनराज सुरडकर यांनीच आपल्या मुलाची हत्या केल्याचं पोलिसांनी उघड केलं. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपी धनराज सुरडकरसह भाऊ हिरालाल सुरडकर आणि धाकटा मुलगा गौरव सुरडकर या तीन आरोपींना अटक केली. त्यांच्या विरोधात फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
जन्मदाताच ठरला कर्दनकाळ, जळगावात बापाकडून मुलाची हत्या, डोक्यात दगड घालून केला खेळ खल्लास
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement