Mumbai : जेवणाच्या पार्सलचा वाद जीवावर, 22 वर्षीय तरुणाचा खून; दोघांना अटक
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लहान गोष्टींवरुन लोकांमध्ये वाद होत असतात. हे वाद अनेकदा एवढे पेटतात की हाणामारी पर्यंत पोहोचतात. छोट्या वादातून मोठमोठी भांडणं घडतात, याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत.
चेंबूर, 9 ऑक्टोबर : लहान गोष्टींवरुन लोकांमध्ये वाद होत असतात. हे वाद अनेकदा एवढे पेटतात की हाणामारी पर्यंत पोहोचतात. छोट्या वादातून मोठमोठी भांडणं घडतात, याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय, ज्यामध्ये छोट्या गोष्टीवरुन तरुणांमध्ये हाणामारी झाली आणि यात एकाला आपला जीव गमवावा लागला. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
शुल्लक कारणावरुन चेंबूर परिसरात तरुणाची हत्या झाली. जेवणाचे पार्सल पहिले कोण घेणार यावरुन तरुणांमध्ये हाणामारी झाली. आणि या भांडणात एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. चेंबूरच्या आर सी मार्गावर असलेल्या सन्निधी बारमध्ये हा वाद झाल्याची घटना समोर आलीय.
advertisement
जेवणाचं पार्सल कोण आधी घेणार यावरुन तरुणांमध्ये भांडण झालं. लाथा बुक्क्यांनी तसेच हातातील कड्याने तरूणाला मारहाण करणात आली. यामध्ये 22 वर्षीय अनिल रणदिवे नावाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेप्रकरणी चेंबूर पोलिसांनी 23 वर्षीय रितीक बजाज आणि 27 वर्षीय हर्षद वलोड्रा याला अटक केली आहे. या धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
दरम्यान, रागाच्या भरात लोकांमध्ये अनेक भांडणं होतात. मात्र कधी कधी ही भांडणं टोकाला जातात. क्षुल्लक कारणावरुन, रागावरुन लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. त्यामुळे ही बाब अतिशय वाईट आणि धक्कादायक आहे. अशा घटनांमध्ये अनेकदाला लोक, तरुणाई आपला जीव गमावतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2023 12:13 PM IST


