Stunt Video : ट्रेनला लटकून तरुणाचा जीवघेणा स्टंट, पाहून उडेल थरकाप
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आजची तरुणाई अनेक धाडसी गोष्टी करताना दिसते. अनेक हटके गोष्टी, स्टंट व्हिडीओ, करत तरुणाई लोकांचं लक्ष वेधत असते. सोशल मीडियावर निरनिराळे स्टंट व्हिडीओ व्हायरल होत असतात.
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : आजची तरुणाई अनेक धाडसी गोष्टी करताना दिसते. अनेक हटके गोष्टी, स्टंट व्हिडीओ, करत तरुणाई लोकांचं लक्ष वेधत असते. सोशल मीडियावर निरनिराळे स्टंट व्हिडीओ व्हायरल होत असतात. स्टंटबाजीची जणू नवी क्रेझच तयार झाली आहे. त्यामुळे जो तो स्टंट करत प्रसिद्धी झोतात येण्याचा प्रयत्न करतो. असाच एक स्टंट व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये तरुण आपला जीव धोक्यात घालत आहे. हा स्टंट व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
एक तरुण ट्रेनने प्रवास करत असतो. मात्र तो ट्रेनच्या बाहेर स्वतःला झोकून देत स्टंट करतो. हे दृश्य खूपच भयानक आहे. तो स्वतः आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहे. हा स्टंट व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
स्टंट व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणाने एका हाताने ट्रेन पकडली आहे आणि आपलं शरीर पूर्णपणे बाहेर झोकून दिलंय. भरधाव वेगाने ट्रेन असूनही तरुण आपला जीव धोक्यात घालताना दिसतोय. समोर झाड, खांब जे काही येईल त्याला चकमा देताना दिसतो. मात्र त्याचा तोल गेला असता किंवा तो कशाला धडकला असता तर नको ते घडलं असतं आणि हा स्टंट तरुणाच्या अंगलट आला असता.
advertisement
What kind of train ride is it?
Say with comment for this smart boy#indianrailway Health Care #LeoTrailerDay #LALISA #ThalapathyVijay #AsianGames2023 #Sultan Gill #atmfey #SanjaySinghArrested Ohio State #HappyBirthdayImranKhan शरद ऋतु #IELIndiaLimited #TejRan #AyeshaSingh pic.twitter.com/Kpbpzy28w2— Smile With Me (@swatipathak658) October 5, 2023
advertisement
@swatipathak658 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा स्टंट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 15 सेकंदाचा हा जीवघेणा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसतायेत. अनेकांनी अशा स्टंटबाजीवर संताप व्यक्त केलाय.
दरम्यान, अशा अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. स्टंट करताना लोकांसोबत अनेक धक्कादायक घटनाही घडल्याचं समोर आलंय. बऱ्याचदा स्टंट करताना लोकांचा तोल जातो, दुखापत होते. कधीतर लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. त्यामुळे अशी स्टंटबाजी करणं खूप धोकादायक असून प्रसिद्धीसाठी असं करणं टाळावं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2023 11:33 AM IST


