Thane Crime: खून का बदला खून! भावासाठी बहिणीने खेळली रक्ताची होळी, चॉपर घेऊन राजकीय ऑफिसमध्ये गेली अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Thane: ठाण्यात एका महिलेनं भावावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी थेट राजकीय पक्षाच्या कार्यालयात घुसून हल्ला केला आहे.
अशोक मांढरे, प्रतिनिधी ठाणे: मागील काही दिवसांपासून ठाण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाण्यात एकावर चॉपर हल्ला झाला होता. या हल्ल्याची घटना ताजी असताना आता ठाण्यात आणखी एक चॉपर हल्ल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेनं भावावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी थेट राजकीय पक्षाच्या कार्यालयात घुसून हल्ला केला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
खरं तर, मागच्या काही काळापासून पुण्यात कोयता गँगने उच्छाद घातला आहे. पुणे शहरासह आसपासच्या परिसरात कोयता गँगच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. पुण्यात कोयता गँग सक्रीय असताना ठाण्यात चॅापर गँग अॅक्टीव्ह झाल्याचं दिसून येत आहे. राजकीय पक्षाच्या कार्यालय बसलेल्या लोकांवर एका महिलेसह एका तरुणाने चॅापरने हल्ला केला आहे.
आफरीन असं हल्लेखोर महिलेचं नाव आहे. या महिलेने भावावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हनिफ नावाच्या मुलाला हाताशी धरलं. दोघांनी मिळून एका राजकीय पक्षाच्या कार्यालयावर चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यात काहीजण जखमी झाले आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी आफरीनचा भाऊ सोहेल खान याच्यावर हल्ला करण्यात आला होता. नवपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ सोहेलवर हल्ला झाला होता. यात सोहेल गंभीर जखमी झाला. सोहेलवर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा बदला घेण्यासाठी आफरीन आणि हनीफने राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसलेल्या लोकांवर हल्ला केला. या हल्ल्या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
May 21, 2025 11:46 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Thane Crime: खून का बदला खून! भावासाठी बहिणीने खेळली रक्ताची होळी, चॉपर घेऊन राजकीय ऑफिसमध्ये गेली अन्...


