Crime News : गरिबांच्या मनरेगातील कोट्यवधी रक्कमेवर डल्ला, भाजप मंत्र्याच्या मुलाला अटक

Last Updated:

Crime News : या घोटाळा प्रकरणी भाजप मंत्र्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. या मंत्र्याच्या मुलाने मनरेगातील 71 कोटींचा निधी लाटल्याचा आरोप आहे.

Crime news
Crime news
अहमदाबाद:  गरिबांसाठी असलेल्या रोजगार हमी योजनेत भ्रष्टचाराची अनेक प्रकरणे समोर येत असतात. आता, मनरेगाच्या निधी घोटाळ्याचे आणखी एका प्रकरण समोर आले आहे. या घोटाळा प्रकरणी भाजप मंत्र्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. या मंत्र्याच्या मुलाने मनरेगातील 71 कोटींचा निधी लाटल्याचा आरोप आहे.
गुजरात सरकारमधील पंचायत राज्यमंत्री बाछू खाबड यांच्या मोठ्या मुलाला अटक केली. बाछू खाबड यांचा मुलगा बलवंत खाबडने हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला बाथवाडा टोल प्लाझाजवळ ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. मागील काही दिवसांपासून तो फरार होता. अखेर पोलिसांनी बलवंत खाबडच्या मुसक्या आवळल्या आहेत. 71 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
advertisement

प्रकरण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, दाहोद जिल्ह्यात श्री राज कन्स्ट्रक्शन कंपनीने नियमांचे पालन न करता मनरेगाचे पैसे लाटले होते. एप्रिल महिन्यात प्रशासनाला या घोटाळ्याबाबत मिळाली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीनुसार 32 कंपन्यांनी देवगड बारिया आणि धानपुर भागात सामग्री दिली होती. यापैकी कुठल्याही कंपनीने सर्वात कमी बोली लावली नव्हती आणि ही बाब नियमबाह्य होती. मनरेगाचा कोणताही प्रकल्प सुरू झाला नव्हता. पण, त्याचे पैसे आधीच लाटल्याचा प्रकार समोर आला.
advertisement
घोटाळ्यातील आरोपी बलवंत आणि त्याचा धाकटा भाऊ किरण यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. परंतु नंतर त्यांनी हे अर्ज मागे घेतले. बलवंत आणि सह-आरोपी दर्शित पटेल यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, विरोधकांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. या मनरेगा घोटाळ्याची व्याप्ती अधिक असण्याची शंका विरोधकांनी उपस्थित केली आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : गरिबांच्या मनरेगातील कोट्यवधी रक्कमेवर डल्ला, भाजप मंत्र्याच्या मुलाला अटक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement