संशयाच्या भूतानं घात केला, अंघोळीसाठी जात असलेल्या पत्नीवर सपासप वार, Facebook Live वर दिली कबुली

Last Updated:

केरळच्या कोल्लममधील पुनालुरमध्ये इसहाकने संशयातून पत्नी शालिनीची हत्या केली आणि फेसबुक लाईव्हवर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

News18
News18
संशयाचं भूत वाईट, एकदा डोक्यात घुसलं की बाहेर निघताना कठीण, याच संशयाच्या भुतानं संसाराची वाट लावली आणि होत्याचं नव्हतंही केलं. संशयातून पतीने अंघोळीला निघेलेल्या पत्नीच्या पाठीवर, छातीवर आणि मानेवर सपासप वार केले. ती जीव वाचवण्यासाठी रक्तबंबाळ अवस्थेत ओरडत होती. मात्र तो थांबला नाही. वार करत राहिला. अखेर तळपायाची आग मस्तकात गेली, त्याने तिच्या गळ्यावर सुरा फिरवून तीला कायमचं शांत केलं.
तडफडत अखेर तिचा मृत्यू झाला. पतीनं रक्ताच्या थारोळ्यात आपल्याच पत्नीचा मृतदेह पाहिला, एकक्षण सून्न अवस्थेत पाहात राहिला आणि त्यानंतर त्याने फेसबुक लाईव्ह करुन आपल्या गुन्ह्याची कबुली सगळ्यांना दिली. केरळमधील कोल्लममधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. पतीने आधी आपल्या पत्नीचा गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली आणि नंतर या गुन्ह्याची कबुली फेसबुकवर लाइव्ह येऊन दिली. ही घटना पाहून आणि ऐकून लाईव्ह पाहणाऱ्यांना मोठा धक्का बसला.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भयानक घटना केरळच्या कोल्लममधील पुनालुर परिसरात घडली. 39 वर्षीय महिला शालिनीची तिच्या पतीने, इसहाक याने गळा चिरून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येनंतर आरोपीने स्वतःहून पुनालुर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केलं आणि पोलिसांना संपूर्ण हत्येची माहिती दिली.
आरोपीने पत्नीवर संशय आणि दागिन्यांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप केला. याशिवाय वैवाहिक जीवानातही अनेक प्रॉब्लेम्स असल्याचं सांगितलं. सकाळी ६.३० च्या सुमारास शालिनी स्वयंपाकघराच्या मागील भागात असलेल्या नळाजवळ अंघोळीसाठी गेली असताना, आरोपीने चाकूने तिच्यावर हल्ला केला. तिच्या मान, छाती आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर त्याने तिचा गळा चिरून तिची हत्या केली.
advertisement
फेसबुक लाइव्हवर गुन्हा कबूल
हत्येनंतर लगेचच आरोपी फेसबुकवर लाइव्ह आला आणि त्याने आपल्या पत्नीच्या हत्येची कबुली दिली. त्याने आपल्या पत्नीवर अविश्वास आणि दागिन्यांची हेराफेरी केल्याचा आरोपही केला.गुन्हा केल्यानंतर तो स्वतःहून पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याची गोष्ट ऐकून पोलीसही थक्क झाले. लगेचच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी, म्हणजेच इसहाकच्या घरी पोहोचले आणि तिथे त्यांना शालिनीचा मृतदेह आढळला.
advertisement
दाम्पत्याच्या १९ वर्षांच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम १०३(१) (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली आहे आणि पीडित व आरोपी दोघांचेही मोबाइल जप्त करण्यात आले असून त्यांची तपासणी सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
संशयाच्या भूतानं घात केला, अंघोळीसाठी जात असलेल्या पत्नीवर सपासप वार, Facebook Live वर दिली कबुली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement