ठाणे हादरलं! IIT च्या विद्यार्थ्याकडून 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, नवीन कपडे देण्याचा बहाणा केला अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
IIT Student Assault Minor in Thane: ठाण्यातील कळवा परिसरात माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका उच्चशिक्षित तरुणाने चक्क शेजारी राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
IIT Student Raped Minor Girl in Thane: ठाण्यातील कळवा परिसरात माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका उच्चशिक्षित तरुणाने चक्क शेजारी राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी तरुण हा भारतातील अव्वल शिक्षण संस्था आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहे. अशात त्याने १३ वर्षीय मुलीला गोड बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय आरोपी तरुण हा उच्चशिक्षित असून तो भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी खरगपूर इथं शिक्षण घेत आहे. तो ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरात वास्तव्याला आहे. गुरुवारी त्याने शेजारील १३ वर्षीय दिव्यांग मुलीला नवीन कपडे दिले. यानंतर तिला फूस लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती पीडित मुलीच्या आईला समजल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
advertisement
तिने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अर्थात पोक्सो कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत नराधम आरोपीला अटक केली आहे. एका उच्च शिक्षित तरुणाने अशाप्रकारे शेजारी राहणाऱ्या मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांनी आरोपीचा मोबाइल फोन तपासला असता, त्याच्या फोनमध्ये इतर काही मुलींचे खासगी फोटो आणि व्हिडीओ आढळून आले आहेत. त्यामुळे आरोपीने त्यांचाही अशाच प्रकारे छळ केला का? याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
June 14, 2025 8:52 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
ठाणे हादरलं! IIT च्या विद्यार्थ्याकडून 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, नवीन कपडे देण्याचा बहाणा केला अन्...


