Jalgaon Crime : 'मित्रांनो प्रेम करू नका, अभ्यास करा...' इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत तरुणाचा टोकाचा निर्णय
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Jalgaon Crime : गांधली येथील 21 वर्षीय गौरव रवींद्र बोरसे या तरुणाने प्रेयसीने नकार दिल्याने गळफास घेतल्याची घटना घडली.
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी, जळगाव: 'मित्रांनो प्रेम करू नका, अभ्यास करा...मुली प्रेम विसरुन जातात', असं व्हिडीओ पोस्ट करत एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गांधली येथील 21 वर्षीय गौरव रवींद्र बोरसे या तरुणाने प्रेयसीने नकार दिल्याने गळफास घेतल्याची घटना घडली.
ही धक्कादायक घटना डुबक्या मारोती रस्त्यालगत असलेल्या झाडाखाली उघडकीस आली. क्रीडा संकुलाच्या शेजारी ही घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गौरवने आत्महत्या केल्याचे समजातच मित्र परिवारातही एकच खळबळ उडाली. त्यानंतर गौरवने काही वेळेपूर्वी एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याचे काहींच्या लक्षात आले.
आत्महत्येआधी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट...
गौरव याने इंस्टाग्रामवर आत्महत्येपूर्वी एक भावनिक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या आईला रडू नको असे सांगत माफी मागितली, तसेच मित्रांना प्रेम न करण्याचा सल्ला दिला. "मी मुलीवर प्रेम केलं, ती विसरून गेली. माझं खरं प्रेम होतं, पण मी अपयशी ठरलो," गौरवने व्हिडीओत "मी चूक करतोय, ती तुम्ही करू नका" असं मित्रांना उद्देशून म्हणत त्याने आयुष्य संपवलं.
advertisement
गौरवने झाडाला दोरी बांधून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. भूषण हेमराज सूर्यवंशी यांनी याबाबत खबर दिल्यानंतर अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या दुर्दैवी घटनेने तरुणाईमध्ये प्रेमविषयक नैराश्य किती घातक ठरू शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दरम्यान, या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Aug 07, 2025 10:35 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Jalgaon Crime : 'मित्रांनो प्रेम करू नका, अभ्यास करा...' इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत तरुणाचा टोकाचा निर्णय









