Crime News: सिगारेटचे पैसे मागताच चहा विक्रेत्याला चाकूनं सपासप कापलं; शिर्डीतील हादरवणारी घटना
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
सिगारेटचे पैसे मागितले म्हणून चहा विक्रेत्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत. यात बाळासाहेब मोकाटे हे गंभीर जखमी झाले आहेत.
हरीश दिमोटे, अहमदनगर : राज्यात दररोज गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येतात. यातील काही घटना या अतिशय विचित्र आणि हादरवून टाकणाऱ्या असतात. सध्या अहमदनगरच्या शिर्डीमधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका चहा विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. सिगारेटचे पैसे मागितल्याने हा हल्ला करण्यात आला आहे.
चहा विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना शिर्डीमध्ये घडली आहे. साईमंदिराच्या गेट नंबर एक समोर ही घटना घडली. सिगारेटचे पैसे मागितले म्हणून चहा विक्रेत्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत. यात बाळासाहेब मोकाटे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या अंगावर अनेक ठिकाणी चाकूचे वार झालेले आहेत. यामुळे रक्तस्त्राव झाला आहे.
advertisement
शिर्डीतील गुंड प्रवृत्तीच्या तरूणांनी हा हल्ला केला आहे. ही घटना पहाटे चार वाजेच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब मोकाटे यांच्यावर साईबाबा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शिर्डीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या घटनेनंतर हल्ला करणारे आरोपी गाडी सोडून घटनास्थळावरून पसार झाले. शिर्डीत दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे, पोलिसांनी गुंडांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचं नागरिक बोलत आहेत.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये 'दृश्यम - 2'
view commentsदुसऱ्या एका घटनेत छत्रपती संभाजीनगर शहरातील अविनाश साळवे खून प्रकरणात आरोपीने मृतदेह वाल्मी परिसरात जलवाहिनीच्या कामाच्या ठिकाणी पूरला होता. क्रांती चौक पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी घेऊन या जागेत 8 ठिकाणी 12 फूट खोल खड्डे खोदल्यानंतर पोलिसांच्या हाती 4 ते 5 मानवी हाडे लागली आहेत. 14 महिन्यांपूर्वी मारून पुरलेल्या घटनेत अखेर खुनाचा उलगडा झाला आहे. अविनाश साळवे यांचा चुलत भाऊ राहुल साळवे यानेच हा खून केला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान खड्ड्यामध्ये मिळालेले हाडांचे तुकडे फॉरेन्सिक विभागाला पाठवून DNA चाचणी केल्यानंतर ते कोणाचे आहेत हे निष्पन्न होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 18, 2024 9:24 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News: सिगारेटचे पैसे मागताच चहा विक्रेत्याला चाकूनं सपासप कापलं; शिर्डीतील हादरवणारी घटना


