WhatsApp, टेलिग्रामवर मेसेज! प्रिया अन् दिव्याने शिरसोलीच्या तरुणाला गोड बोलून गंडवलं; 5 लाखांचा चुना
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
शुभमला 28 आणि 29 मे दरम्यान व्हॉट्सअप आणि टेलिग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रिया शर्मा असं नाव सांगणाऱ्या युवतीने मेसेज पाठवून संपर्क केला
जळगाव (नितीन नांदुरकर, प्रतिनिधी) : शिरसोलीच्या 27 वर्षीय युवकाची मोठी फसवणूक झाली आहे. दोन तरुणींवर विश्वास ठेवणं त्याला चांगलंच महागात पडलं. टेलिग्रामवर फेक आयडी तयार करून त्या दोघी त्याला वेळोवेळी टास्क देत असायचा. तसंच त्याद्वारे पैसे देण्याचं आमिष दाखवून त्यांनी शिरसोलीच्या 27 वर्षीय युवकाची 5 लाखांची फसवणूक केली आहे. नुकताच हा ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी युवकाच्या फिर्यादीवरून दिव्या बस्सी आणि प्रिया शर्मा नावाच्या युवतींवर जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम दिलीप लांबोळे असं फसवणूक झालेल्या युवकाचं नाव आहे. शुभमला 28 आणि 29 मे दरम्यान व्हॉट्सअप आणि टेलिग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रिया शर्मा असं नाव सांगणाऱ्या युवतीने मेसेज पाठवून संपर्क केला. त्यानंतर दिव्या बस्सी नावाच्या तरुणीनेही शुभमला वारंवार संपर्क केला.
advertisement
दोघींनी त्याचा विश्वास संपादन करून त्याला वेगवेगळे टास्क पूर्ण करायला लावले. या टास्कमध्ये जर पैसे गुंतवले तर अधिकचा नफा होईल, असं आमिष त्याला दाखविण्यात आलं. या दरम्यान, युवकाने आपल्या बँकेच्या तीन वेगवेगळ्या अकाऊंटवरुन एकूण 5 लाख 23 हजार रुपयांची रक्कम त्यात भरली. मात्र, त्यात झालेल्या नफ्याची रक्कम शुभमला शेवटी मिळालीच नाही.
advertisement
5 लाख 23 हजार रुपयांपैकी केवळ 2800 रुपयेच शुभमला मिळाले. संपर्क साधूनही रक्कम मिळत नसल्याने त्याला संशय आला. यानंतर काही वेळानंतर हे अकाऊंट आणि फोन नंबर बंद झाले. शुभमला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 03, 2024 11:49 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
WhatsApp, टेलिग्रामवर मेसेज! प्रिया अन् दिव्याने शिरसोलीच्या तरुणाला गोड बोलून गंडवलं; 5 लाखांचा चुना


