Ashok Dhodi : शिवसेना पदाधिकाऱ्याच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्वीस्ट, सख्खा भाऊच मुख्य आरोपी? खळबळजनक खुलासा

Last Updated:

अविनाश धोडी यांना लवकरात लवकर अटक करून आमच्या वडिलांना सुखरूप घरी सोडावं असं आवाहन करतानाच अशोक धोडी यांचा मुलगा आकाश याने आरोपी अविनाश धोडी यांच्यापासून आमच्या जीवालाही धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे.

ashok dhodi kidnapping case
ashok dhodi kidnapping case
Ashok Dhodi Kidnapping Case Update : राहुल पाटील,पालघर : पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी हे मागील 10 दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे धोडी यांचा अपहरण किंवा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यातील अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश उर्फ आवी धोडी संशयित पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. पोलीस आता अविनाश धोडीचा शोध घेत आहे.अशात आता अविनाश धोडीच हेच अशोक धोडी यांच्या अपहरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा खळबळजनक खुलासा धोडी कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांनी अशोक धोडींचे भाऊ अविनाश धोडी हेच अशोक धोडी यांच्या अपहरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. तर अविनाश धोडी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आतापर्यंत 15 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचा दावा देखील अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अविनाश धोडी यांना लवकरात लवकर अटक करून आमच्या वडिलांना सुखरूप घरी सोडावं असं आवाहन करतानाच अशोक धोडी यांचा मुलगा आकाश याने आरोपी अविनाश धोडी यांच्यापासून आमच्या जीवालाही धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे कुटुंबियांच्या या आरोपानंतर अशोक धोंडी यांच्या अपहरणात सख्खा भाऊच मुख्य सुत्रधार असल्याचे स्पष्ट होतं आहे.
advertisement
दरम्यान या प्रकरणात आता आठ पथक विविध ठिकाणी तैनात करून तपास सूरू केला होता. यामध्ये 4 जणांना ताब्यातही घेतल्याची माहिती आहे. तसेच संशयित आरोपी म्हणून घोलवड पोलिसांनी अविनाश धोडी याला चौकशीसाठी बोलावलं होतं. पण घोलवड पोलीस ठाण्याऐवजी पोलीस चौकीवर अविनाश धोडी हा चौकशीसाठी आला होता. पण नंतर अंधाराचा फायदा घेऊन तो फरार झाला होता. त्यानंतर आता घोलवड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाश धोडीचा शोध सूरू आहे.
advertisement

सहा पथक आरोपीच्या मागावर

जमीन आणि संपत्तीच्या वादातून अशोक धोडी यांचे अपहरण करून घातपात केल्या असल्याचा संशय पोलिसांना बळावला होता. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत आहेत. पालघर पोलिसाचे 6 वेगवेगळे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. डहाणू,वाणगाव, नागझरी, गुजरातच्या दादरा नगर हवले परिसरात पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. त्यामुळे आज दुपारपर्यंत अशोक धोडी अपहरण प्रकरणाचे सर्व खुलासे होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Ashok Dhodi : शिवसेना पदाधिकाऱ्याच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्वीस्ट, सख्खा भाऊच मुख्य आरोपी? खळबळजनक खुलासा
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement