Indore Crime : पोरगं निघालं 'आरोपी' आईने हंबरडा फोडला, आरोप फेटाळून लावत म्हणाल्या 'तो फक्त 20 वर्षांचा...'

Last Updated:

Raja Raghuvanshi Murder Case : इंदोरच्या राजा रघुवंशी खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी राज कुशवाहाच्या आईने आपल्या मुलाला निर्दोष सिद्ध करण्याची मागणी केली आहे.

Raj Kushwaha mother cries and says my child innocent
Raj Kushwaha mother cries and says my child innocent
Indore Couple Missing Murder Case : इंदोरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात राज सिंग कुशवाहा याला सोमवारी अन्य तीन आरोपींसह अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राजचा सहभाग (Raja Raghuvanshi Murder Case) असल्याचे समोर आले आहे, परंतु त्याच्या आईने त्याला निर्दोष म्हटलं आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून, पोलीस अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता राज कुशवाहा याच्या आईने हंबरडा फोडल्याचं दिसून आलं. माझा मुलगा फक्त 20 वर्षांचा आहे, तो कसं काय कुणाला मारू शकतो? असा सवाल राजच्या आईने विचारला आहे.

20 वर्षांचा मुलगा असं कसं करू शकतो?

राजा रघुवंशी खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी राज कुशवाहाच्या आईने आपल्या मुलाला निर्दोष सिद्ध करण्याची मागणी केली आहे. "कृपया माझ्या मुलाला निर्दोष सिद्ध करा. 20 वर्षांचा मुलगा असे कसे करू शकतो? तुम्ही सर्वजण एका आईचे दुःख समजू शकता. तोच आमच्या सर्वांची काळजी घेणारा एकुलता एक आहे," असे म्हणत त्यांनी पोलिसांना आणि न्यायव्यवस्थेला भावनिक आवाहन केलं आहे. तसेच राजच्या बहिणीने देखील आरोप फेटाळून लावले आहेत.
advertisement
advertisement

राज सोमनला दिदी म्हणायचा...

सोनमसह राजा रघुवंशीची हत्या करणाऱ्या राज कुशवाहाच्या बहिणीचा दावा आहे की माझा भाऊ हे करू शकत नाही. बहिणी आणि आईने मीडियाला सांगितले की राजला कटाचा भाग म्हणून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो हे अजिबात करू शकत नाही. सोनमसोबतच्या रिलेशनशिपमध्ये असल्याबद्दल विचारले असता बहिणी म्हणाली, 'माझा भाऊ तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये कसा असू शकतो? तो तिला दीदी म्हणायचा. दोघांमध्ये नोकर-मालकाचे नातं होतं, असं राजची बहिण म्हणाली.
advertisement

विपिन रघुवंशीला डाऊट

दरम्यान, राजा रघुवंशी यांचे भाऊ विपिन रघुवंशी यांनी एक मोठा आरोप केला आहे. विपिन रघुवंशी यांच्या मते, आम्हाला खात्री आहे की या प्रकरणात ५ हून अधिक आरोपी आहेत. सोनमने आत्मसमर्पण केले तेव्हा तिने तिच्या भावाला फोन करून सांगितले की कोणीतरी तिला इथे सोडून गेले आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
Indore Crime : पोरगं निघालं 'आरोपी' आईने हंबरडा फोडला, आरोप फेटाळून लावत म्हणाल्या 'तो फक्त 20 वर्षांचा...'
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement