लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार, माजी मंत्र्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल

Last Updated:

Crime in Thane: राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माजी मंत्र्याच्या पुतण्यावर अत्याचारा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News18
News18
ठाणे: राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतेज पाटील यांच्या पुतण्यावर ठाण्यातील एका उच्चभ्रू संकुलात राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
पृथ्वीराज पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. तो सतेज पाटील यांचा पुतण्या आणि डी वाय पाटील यांचा नातू आहे. पृथ्वीराज पाटील याच्यावर ठाण्यातील कापूर बावडी परिसरात राहणाऱ्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचं देखील तक्रारीत म्हटलं आहे.
advertisement
पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणी आणि पृथ्वीराज पाटील मागील काही काळापासून एकमेकांना ओळखतात. दोघांमध्ये प्रेम संबंध होते. पृथ्वीराज पाटील याने लग्नाचं आमिष दाखवून पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. ठाणे, नवी मुंबईसह कोल्हापूर येथील बंगल्यावर घेऊन जात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
एवढंच नव्हे तर या संबंधातून पीडित तरुणी गर्भवती राहिली होती. तेव्हा आरोपीनं पीडितेला धमकावून कोल्हापूर येथील एका रुग्णालयात गर्भपात घडवला, असा आरोप पीडितेनं तक्रारीत केला आहे. यावेळी पीडितेनं गर्भपात केल्याचा रुग्णालयाचा रिपोर्ट आणि आरोपीसोबत केलेलं चॅटींग पुरावा म्हणून पोलिसांकडे जमा केला आहे. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक केली नाही. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार, माजी मंत्र्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement