I Love You बोला आणि सुट्ट्या घ्या, शिक्षकाचे नको ते कारनामे, दुसरीतल्या मुलींची छेड!

Last Updated:

School Crimes: लहान मुलांना प्रेम म्हणजे काय, ते कसं व्यक्त करतात याची भनकही पालक लागू देत नाहीत. शिवाय मुलांनी नकळत्या वयात नको त्या गोष्टींसाठी भरकटत जाऊ नये असा आदर्श शिक्षकांचाही प्रयत्न असतो. परंतु या शिक्षकाला कसलं काय...

चिमुकल्यांच्या तोंडून छेड, आय लव्ह यू हे शब्द ऐकूनच पालक संतापले.
चिमुकल्यांच्या तोंडून छेड, आय लव्ह यू हे शब्द ऐकूनच पालक संतापले.
ज्ञानेंद्र सिंग, प्रतिनिधी 
रोहतास : आई-वडील आणि देवानंतर आपण शिक्षकांना गुरू मानतो. शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात, पुस्तकी ज्ञानापलिकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य वळण देण्याचं मौल्यवान कार्य ते करतात. परंतु आजकाल असे प्रकार समोर येऊ लागले आहेत की, मुलांना डोळे झाकून शाळेत पाठवायचं की नाही असा भीतीदायक प्रश्नच पालकांच्या मनात निर्माण होतो.
काही महिन्यांपूर्वीच बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारानं अख्खा देश हादरला. त्यानंतर अनेक ठिकाणहून अशा हादरवणाऱ्या घटना समोर आल्या. एका प्राथमिक शाळेतील शिक्षकानं तर सगळ्या मर्यादाच पार केल्या. त्यानं चक्क विद्यार्थिनींनाच I Love You बोलायला सांगितलं.
advertisement
लहान मुलांना प्रेम म्हणजे काय, ते कसं व्यक्त करतात याची भनकही पालक लागू देत नाहीत. शिवाय मुलांनी नकळत्या वयात नको त्या गोष्टींसाठी भरकटत जाऊ नये असा आदर्श शिक्षकांचाही प्रयत्न असतो. I Love You या शब्दांचा अर्थ होतो माझं तुमच्यावर प्रेम आहे. या भावना व्यक्त करण्यात काही गैर नाही. मात्र लहान मुलांना हे शिकवल्यास त्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शिवाय हे शब्द बोलण्यासाठी कोणीच कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. परंतु या शिक्षकाला कसलं काय...त्यानं चक्क मुलींना आमिषच दाखवलं. म्हणे, 'मला आय लव्ह यू बोला आणि हव्या तेवढ्या सुट्ट्या घ्या.'
advertisement
इयत्ता दुसरी, तिसरीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनी. त्या कितीही आजारी पडल्या तरी त्यांना शाळेतून काही सुट्टी मिळायची नाही. त्यामुळे पालकांना जरा संशय आला होता. शिवाय मुली शाळेत जायलाही घाबरायच्या. अखेर पालकांनी खोदून खोदून विचारल्यावर काही विद्यार्थिनींनी इश्तियाक अहमद सर आमची छेड काढतात, आम्हाला सुट्टी हवी असेल तर आय लव्ह यू बोलायला लावतात, असं सांगितलं. चिमुकल्यांच्या तोंडून छेड, आय लव्ह यू हे शब्द ऐकूनच पालक संतापले. त्यांनी शाळेत येऊन त्या शिक्षकाला चांगलंच झापलं. त्याला मारण्याची गरजच पडली नाही, कारण शब्दांनीच पालकांनी त्याला धुतलं. या प्रकरणाची दखल मुख्याध्यापकांनीही घेतली. त्यांनी घडलेल्या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली. परंतु पालक खूप भडकले होते, 'तुमचं लक्ष कुठे असतं', असा जाब त्यांनी मुख्याध्यापकांना विचारला. गोंधळ प्रचंड वाढला.
advertisement
अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी इश्तियाक अहमदला ताब्यात घेतलं. आता त्याची चौकशी सुरू आहे. ठोस पुरावा मिळताच कठोर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, बिहार राज्यातील रोहतास भागात असलेल्या सोनौरा विद्यालयातून हा गंभीर प्रकार समोर आला.
मराठी बातम्या/क्राइम/
I Love You बोला आणि सुट्ट्या घ्या, शिक्षकाचे नको ते कारनामे, दुसरीतल्या मुलींची छेड!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement