मैत्रिणीच्या रुममध्ये रात्रभर गप्पा, पहाटे झाला कांड, तरुणाने मित्राचा चावा घेत तोडला कान
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Thane: ठाण्यातील कासार वाडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या मित्राच्या कानाचा जबरी चावा घेतला आहे.
ठाणे: ठाण्यातील कासार वाडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या मित्राच्या कानाचा जबरी चावा घेतला आहे. संबंधित आरोपी आपल्या मित्रासह मैत्रिणीच्या रुममध्ये रात्रभर गप्पा मारत होता. मात्र पहाटे झालेल्या वादातून तरुणाने मित्राच्या कानाचा चावा घेतला आहे. या प्रकरणी कासार वडवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित तरुणाची एक मैत्रीण राहते. अलीकडेच या मैत्रीणीची एक शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे घटनेच्या दिवशी २५ फेब्रुवारीला पीडित तरुण आपल्या मैत्रिणीची विचारपूस करायला तिच्या घरी आला होता. यावेळी त्याने मैत्रीण राहत असलेल्या इमारतीत राहणाऱ्या आपल्या एका मित्रालाही मैत्रिणीच्या घरी बोलावून घेतलं.
advertisement
तिघेही एका रुममध्ये बसून गप्पा मारत होते. तिघांमधील संवाद पहाटेपर्यंत चालला. दरम्यान, एका क्षुल्लक कारणातून पीडित तरुणाचा आणि मैत्रिणीच्या इमारतीत राहणाऱ्या मित्राचा वाद झाला. अचानक सुरू झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर मैत्रिणीच्या इमारतीत राहणाऱ्या मित्राने भेटायला आलेल्या मित्राच्या कानाचा चावा घेतला. हा चावा इतका भयंकर होता की संबंधित तरुणाच्या कानाची पाळी फाटली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला.
advertisement
या घडलेल्या प्रकारानंतर पीडित तरुणाने कासारवडवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपी मित्राविरोधात गुन्हा दाखल केला, तसेच जमखी तरुणाला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. आता हा वाद नेमका कोणत्या कारणातून झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पोलस कारणाचा शोध घेत आहेत.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
March 01, 2025 10:38 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
मैत्रिणीच्या रुममध्ये रात्रभर गप्पा, पहाटे झाला कांड, तरुणाने मित्राचा चावा घेत तोडला कान


