शुभांगी शिंदे हुंडाबळी प्रकरण, पैशांसाठी लाज विकली, विवाहितेला छळ छळ छळलं, बीडमधील भाजपचा नेता फरार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Beed: गुरुवारी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता गावात शुभांगी शिंदे नावाच्या २५ वर्षीय विवाहितेनं मृत्यूला कवटाळलं. या प्रकरणातील सहआरोपी भाजप नेता फरार झाला आहे.
धारूर: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण चांगलंच गाजत आहे. माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून पुण्यात वैष्णवी हगवणे या २३ वर्षीय विवाहितेनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू-सासरे, दीर आणि नणंद यांना अटक केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर याचे राज्यभर पडसाद उमटले. सर्व बाजुंनी टीका झाली. ही घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरत असताना देखील राज्यातील हुंडाबळीची प्रकरणं कमी होताना दिसत नाहीयेत.
गुरुवारी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता गावात शुभांगी शिंदे नावाच्या २५ वर्षीय विवाहितेनं मृत्यूला कवटाळलं. सासरी पैशांसाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती संतोष शिंदे, विलास शिंदे, सुमन शिंदे, सीमा शिंदे आणि भाजपचा धारूर तालुकाध्यक्ष संदीप काचगुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र भाजपचा नेता काचगुंडे मात्र फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये शुभांगी शिंदेचा विवाह गित्ता येथील संतोष शिंदे यांच्याशी झाला होता. त्यांना दीड वर्षांचा मुलगा आहे. संतोष शिंदे यांचं अंबाजोगाई आणि धारुर येथे ऑप्टीकलची दोन दुकानं आहेत. अशात त्यांना तिसरं दुकान सुरू करायचं होतं. तिसरे दुकान टाकण्यासाठी माहेरहून पैसे आण, म्हणत आरोपींनी सासरी शुभांगीचा छळ केल्याचा आरोप आहे.
advertisement
सासरी मुलीचा छळ होत असल्याने माहेरच्या मंडळींनी काही दिवसांपूर्वी आरोपींना १ लाख रुपये दिले होते. मात्र काही दिवसांनी पुन्हा पैशांची मागणी होऊ लागली. त्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये ४ लाख रुपये दिले होते. मात्र काही दिवस झाल्यानंतर पुन्हा पैशांची मागणी होऊ लागली. एवढंच नाही तर ६ महिन्यांपूर्वी आरोपींनी विवाहितेला माहेरी मोहखेड (ता. धारूर) येथे आणून सोडले होते. ४ लाख दिले तरच नांदवू अशी धमकी दिली होती. गुरुवारी शुभांगीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुभांगीच्या मृत्यूने दीड वर्षांचा चिमुकला पोरका झाला आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Jun 07, 2025 7:09 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
शुभांगी शिंदे हुंडाबळी प्रकरण, पैशांसाठी लाज विकली, विवाहितेला छळ छळ छळलं, बीडमधील भाजपचा नेता फरार









