Thane Crime: आई वडिलांनी 6 दिवसांच्या मुलीला पैशांसाठी विकलं, आजीनं डाव हाणून पाडला
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Thane: उल्हासनगरमध्ये सहा दिवसांच्या नवजात मुलीला आई-वडिलांनी 90 हजारात विकल्याचा प्रकार उघड झाला आहे. पण आजीने आई वडिलांचा डाव हाणून पाडला आहे.
ठाणे: ठाणे जिल्ह्याच्या उल्हासनगरमध्ये सहा दिवसांच्या नवजात मुलीला तिच्याच आई-वडिलांनी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी आई वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीची अवघ्या 90 हजारात विक्री केली होती. मात्र आजीने प्रसंगावधान दाखवत नातीला परत मिळवलं आहे. आजीने आपलाच मुलगा आणि सुनेसह बाळ विकत घेणाऱ्यांविरोधात फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करत मुलीची सुटका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 च्या मराठा सेक्शन परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांच्या घरी 22 जानेवारी रोजी मुलीचा जन्म झाला. मात्र अवघ्या सहा दिवसातच मुलीच्या आई आणि वडिलांनी 90 हजारात तिची विक्री केली. दरम्यान, बाळाची आजी बाळाला बघण्यासाठी रुग्णालयात गेली. त्यावेळी सुनेजवळ आपली नात नसल्याचं तिला दिसून आलं. तिने आपल्या मुलगा विशालकडे नातीबाबत विचारपूस केली. यावेळी विशालने बाळाची विक्री केल्याचं आईला सांगितलं.
advertisement
हे ऐकल्यानंतर आजीच्या पायाखालची जमीन सरकरली. त्यांनी तातडीने बाळ परत मिळवण्यासाठी प्रयत्न केला. घेतलेले पैसे परत देऊन बाळ परत आणा, असं आजीने विशालला सांगितले. पण विशालने यावर काहीच प्रतिसाद दिला नाही. तसेच ज्यांना बाळ विकलं, त्यांच्याबद्दलही आजीला काही माहीत नव्हतं. त्यामुळे आजीने तातडीने उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी सगळा प्रकार पोलिसांना सांगितला.
advertisement
आजीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या आई वडिलांसह, मध्यस्थी करणारी महिला आणि बाळ विकत घेणारं शेख कुटुंब यांच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. बाळाची विक्री नेमकी कशामुळे केली होती? अशाप्रकारे शेख कुटुंबीयांनी यापूर्वी नवजात बालकांना विकत घेतलं होतं का? याचा सविस्तर तपास उल्हासनगर पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
January 30, 2025 9:03 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Thane Crime: आई वडिलांनी 6 दिवसांच्या मुलीला पैशांसाठी विकलं, आजीनं डाव हाणून पाडला


