बार डान्सरवर जडला जीव, लिव्ह इनमध्येही राहिले, पण प्रेमाचा रक्तरंजित शेवट, तरुणीचा गळा चिरून खून
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Man killed Live in Partner: ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे.
मीरा रोड: ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी गुरुवारी रात्री उशिरा प्रेयसीचा धारदार चाकुने गळा चिरला. यानंतर आरोपी घटना स्थळावर पळून गेला. मात्र अवघ्या चार तासात पोलिसांनी आरोपीला गजाआड केलं आहे. जिला जीव लावला, जिच्यावर प्रेम केलं, तिलाच अशाप्रकारे तरुणाने संपवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
करीना अली असं हत्या झालेल्या २४ वर्षीय तरुणीचं नाव आहे. तर शमशुद्दीन मोहम्मद खुर्शीद हसीफ असं २४ वर्षीय आरोपी प्रियकराचं नाव आहे. दोघंही मीरा रोड येथील म्हाडा हाऊसिंग सोसायटीमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. करीना बार डान्सर म्हणून काम करत होती. तर शमशुद्दीन पेशाने शेफ आहे. तो मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये काम करतो.
advertisement
प्रेयसीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शमशुद्दीनला करीनाचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या संशयामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. गुरुवारी रात्री शमशुद्दीनने करीनाला फोनवर कोणाशी तरी बोलताना पाहिले. तेव्हा त्याला संताप अनावर झाला. यानंतर त्याने रागाच्या भरात शमशुद्दीनने धारदार चाकुने करीनाचा गळा चिरला. करीनाची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
advertisement
चार तासांत आरोपीला बेड्या
पण घराचा दरवाजा उघडा राहिल्याने आजूबाजूच्या लोकांना संशय आला. त्यांनी लगेच या घटनेची माहिती पोलिसांना माहिती दिली. मीरा रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या चार तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. या घटनेचा पुढील तपास मीरारोड पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Mira-Bhayandar,Thane,Maharashtra
First Published :
June 14, 2025 7:43 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बार डान्सरवर जडला जीव, लिव्ह इनमध्येही राहिले, पण प्रेमाचा रक्तरंजित शेवट, तरुणीचा गळा चिरून खून


