Crime News : मामाच्या लग्नासाठी 2000 किमी प्रवास करून गावी आला, पण पेरुच्या बागेत घडलं भयंकर...

Last Updated:

Crime News : आपल्या मामाच्या लग्नासाठी जवळपास 2000 किमीचा प्रवास करून भाचा गावी आला. मात्र, त्याच्या आयुष्याची अखेर या मामाच्या गावी झाल्याची धक्कादायक घटना घडली. पेरुच्या बागेत या तरुणाचा मृतदेह आढळून आला.

Crkme news
Crkme news
बहराइच: आपल्या मामाच्या लग्नासाठी जवळपास 2000 किमीचा प्रवास करून भाचा गावी आला. मात्र, त्याच्या आयुष्याची अखेर या मामाच्या गावी झाल्याची धक्कादायक घटना घडली. पेरुच्या बागेत या तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलीस तपासात या हत्येचे धक्कादायक कारण समोर आले आहे. या हत्येत नातेवाईकही असून कारण समजल्यानंतर सगळेच हादरले आहेत.
मागील काही वर्षांमध्ये तरुणांना सोशल मीडियाचे वेड लागले आहे. त्याशिवाय, रीलच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. चांगल्या दर्जाचे रील्स तयार करण्यासाठी मामाच्या लग्नात आलेल्या शादाब या 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केली असल्याचे समोर आले आहे.
शादाब हे बंगळुरू येथे राहत होता. मामा के लग्नामुळं तो 20 जूनच्या सकाळी नागौरला आला. नकळतच त्याच्याकडे असलेला नवीन आयफोन गावात चर्चेचा विषय झाला. गावातील दोन अल्पवयीन मुलांना आयफोन पाहून हाव सुटली. मग, त्यांनी 20 जून रोजी रात्री याच मोबाईलसाठी मुलांनी शादाबला रील तयार करण्याच्या बहाण्याने गावाबाहेर नेले.
advertisement
शादाबला गावा बाहेर नेल्यानंतर त्याच्या आयफोनसाठी आरोपींनी गळा चिरला. त्याशिवाय, त्याच्या डोक्यावर विटेने जोरदार वार करत क्रूर हत्या केली.
शादाब अचानकपणे गायब झाल्याने घरातील मंडळींनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो न सापडल्याने अखेर शादाब हा बेपत्ता असल्याची पोलीस तक्रार 21 जून रोजी करण्यात आली. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्याच दिवशी पोलिसांना पेरुच्या बागेत गळा चिरलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळला.
advertisement
पोलिसांनी लागलीच तपास सुरू केला. त्यानंतर या प्रकरणी आरोपी व त्यांना हत्या प्रकरणात मदत करणाऱ्या एका नातेवाईकास पोलिसांनी अटक केली तर आणखी एक नातेवाईक फरार असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींकडून शादाबचा आयफोन, चाकू आणि वीट जप्त करण्यात आली. शादाबचा मृतदेह आढळल्यानंतर आरोपी आणि त्याचे कुटुंबीय पसार झाले. पोलीस या प्रकरणातील चौथ्या आरोपीच्या मागावर आहेत.
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : मामाच्या लग्नासाठी 2000 किमी प्रवास करून गावी आला, पण पेरुच्या बागेत घडलं भयंकर...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement