Shivani Sonar-Ambar Ganpule Wedding: शिवानी सोनार-अंबर गणपुळे अडकले लग्नबंधनात, पाहा पारंपरिक सोहळ्याची पहिली झलक!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Shivani Sonar-Ambar Ganpule: अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे लग्नबंधनात अडकले आहेत.
मुंबई : सध्या लग्नसराईचे दिवस असून अनेक लोक लग्न करत आहेत. यामध्ये बऱ्याच कलाकारांचीही लग्नघाई सुरू असलेली पहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. अशातच कलाविश्वातील आणखी एका जोडीने लग्न केलं आहे. अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
'राजा राणीची गं जोडी' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिवानी सोनारने तिचा बॉयफ्रेंड अंबर गणपुळेसोबत लग्नगाठ बांधली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या जोडीच्या लग्नाच्या चर्चा होत्या. त्यांच्या लग्नाआधीच्या विधीही सोशल मीडियावर शेअर व्हायरल होत होत्या. अखेर हे जोडपं लग्नबंधनात अडकलं असून दोघांवर शुभेच्छा आणि आशिर्वादाचा वर्षाव होत आहे.
advertisement
शिवानी आणि अंबरच्या लग्नाची पहिली झलक समोर आली असून फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. दोघांनी अगदी थाटामाटात लग्न केलं. पारंपारिक पद्धतीने दोघांनी सातफेरे घेतले. दोघांचा मराठमोळा पेहराव चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
advertisement
दरम्यान, लग्नात शिवानीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली असून त्यावर भरजरी दागिने घातले आहेत. अंबरने फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता आणि फिकट हिरव्या रंगाचं धोतर घातलं आहे. दोघेही नववधू आणि वर एकदम सुंदर दिसत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 21, 2025 2:39 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Shivani Sonar-Ambar Ganpule Wedding: शिवानी सोनार-अंबर गणपुळे अडकले लग्नबंधनात, पाहा पारंपरिक सोहळ्याची पहिली झलक!


