'यहा झुकनाही पडेगा...', एअरपोर्टवर CISF ऑफिसरसमोर चालली नाही अल्लू अर्जुनची ‘पुष्पागिरी’, VIDEO VIRAL
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Allu Arjun Airpost Video : साउथ सिनेमातील सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या दमदार अभिनयामुळे आणि व्यक्तिमत्त्वामुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी तो एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.
मुंबई : मैं झुकेगा नही साला म्हणत अल्लू अर्जुनने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीत इमेज सेट केली. अल्लू अर्जुन आता त्याच्या पुष्पा स्टाइलसाठी ओळखला जातो. मैं झुकेगा नही साला हे सिनेमात ठीक होतं पण एअरपोर्टवर असं काही घडलं ज्यामुळे CISF अधिकाऱ्यासमोर अल्लू अर्जुनला झुकावंच लागलं. तो आधी कितीही नाही म्हणाला तरी नियमांपुढे त्याला झुकावंच लागलं. एअरपोर्टवर असं काय घडलं? त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
साउथ सिनेमातील सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या दमदार अभिनयामुळे आणि व्यक्तिमत्त्वामुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी तो एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात तो विमानतळावर CISF अधिकाऱ्याशी वाद घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्सनी त्याच्यावर टीका केली आहे.
advertisement
मास्क काढण्यावरून वाद
व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन आपल्या टीमसोबत विमानतळावर दिसतो. एन्ट्री गेटवर तैनात असलेल्या CISF अधिकाऱ्याने त्याला पासपोर्टवरील फोटोशी चेहरा जुळवण्यासाठी मास्क काढण्यास सांगितले. मात्र व्हिडिओवरून दिसते की अर्जुनने मास्क न काढायला तयार नाही. त्यांच्यात काहीसा वाद झाला. या दरम्यान त्याच्या टीममधील एक सदस्यही मध्ये बोलताना दिसतो. शेवटी अर्जुनला प्रोटोकॉलच्या नियमाचे पालन करावे लागले आणि त्याने मास्क थोडा खाली करून आपला चेहरा दाखवला. त्यानंतर त्याला एन्ट्री मिळाली.
advertisement
Please follow the rules 🙏
Yesterday at Airport security , Allu Arjun was stopped by an officer and asked to show his face with Id. Allu was initially reluctant, and after a brief exchange of words, his assistant tried to convince the officer that he was Allu Arjun. Even then,… pic.twitter.com/sv0i6mf6EU
— Telugu360 (@Telugu360) August 10, 2025
advertisement
सोशल मीडियावर ट्रोलिंग
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या. एका युजरनं कमेंट करत लिहिलंय, "त्याला पुन्हा अटक करा." दुसऱ्यानं म्हटलंय, "कधी चेंगराचेंगरी तर कधी एअरपोर्टवर नाटक." आणखी एकानं लिहिलंय, "इथे तुला झुकावंच लागलं."
अल्लू अर्जुन अपकमिंग वर्कफ्रंट
अल्लू अर्जुन शेवटचा 2024 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा 2' मध्ये दिसला होता. आता तो दिग्दर्शक अॅटली कुमार यांच्या आगामी सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर झालेले नाही. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 11, 2025 2:37 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'यहा झुकनाही पडेगा...', एअरपोर्टवर CISF ऑफिसरसमोर चालली नाही अल्लू अर्जुनची ‘पुष्पागिरी’, VIDEO VIRAL


