अल्लू अर्जुनच्या Pushpa 3 विषयी मोठी अपडेट, सीक्वल झाला कंफर्म, पण कधी होणार रिलीज?

Last Updated:

Pushpa 3 Update: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

अल्लू अर्जुनच्या Pushpa 3 विषयी मोठी अपडेट
अल्लू अर्जुनच्या Pushpa 3 विषयी मोठी अपडेट
मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. पहिल्या आणि दुसऱ्या भागाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता चाहते तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा 3' प्रदर्शित होण्यासाठी अजूनही वेळ आहे. अलिकडेच, निर्माते रविशंकर यांनी अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 3' बद्दल नवीन अपडेट दिली आहे आणि हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित होईल हे देखील त्यांनी उघड केले आहे.
'पुष्पा 2' च्या शेवटी सिक्वेलचे संकेत मिळाल्यानंतर, चाहते गेल्या काही महिन्यांपासून 'पुष्पा 3' बद्दल अंदाज लावत आहेत. पण आतापर्यंत कोणतीही बातमी नव्हती. अलिकडेच एका कार्यक्रमात निर्माते रविशंकर यांनी सांगितले की, पुढील भागाचे चित्रीकरण लवकरच सुरू होईल. 'पुष्पा 3' नक्कीच बनवला जाईल, पण चाहत्यांना त्यासाठी थोडी वाट पहावी लागेल, अशी पुष्टी त्यांनी केली.
advertisement
सध्या अल्लू अर्जुन दोन मोठ्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे, एक अ‍ॅटली दिग्दर्शित आहे आणि दुसरा त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित आहे. हे दोन्ही चित्रपट पूर्ण होण्यासाठी अंदाजे 2 वर्षे लागतील. यानंतर 'पुष्पा 3' चे शूटिंग सुरू होईल. दिग्दर्शक सुकुमार देखील त्यांच्या आगामी चित्रपटात व्यस्त आहेत, जो तो राम चरणसोबत बनवत आहे. हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील. मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक दोघेही व्यस्त असल्याने, 'पुष्पा 3' चे चित्रीकरण सुमारे अडीच वर्षांनी सुरू होण्याची शक्यता आहे.
advertisement
रविशंकर म्हणाले की, यावेळी त्यांची टीम वेगाने काम करत आहे आणि 2028 मध्ये 'पुष्पा 3' प्रदर्शित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. निर्मात्याने सांगितले, 'आम्ही पूर्वीसारखे काम पुढे ढकलणार नाही, उलट आम्हाला आशा आहे की आम्ही तीन वर्षांत लवकर परत येऊ आणि चित्रपट 2028 मध्ये प्रदर्शित होईल.'
मराठी बातम्या/मनोरंजन/
अल्लू अर्जुनच्या Pushpa 3 विषयी मोठी अपडेट, सीक्वल झाला कंफर्म, पण कधी होणार रिलीज?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement