Gautami Patil : 'गौतमीला काहीही येत नाही', अमेय वाघने केली गौतमीची पोलखोल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Amey Wagh on Gautami Patil Cooking Reality : अमेय वाघने 'शिट्टी वाजली रे' शोमध्ये हेमंत ढोमे आणि गौतमी पाटीलच्या स्वयंपाक कौशल्याबद्दल मजेशीर किस्सा सांगितला. डान्सर गौतमी पाटीलची चांगलीच पोलखोल केली आहे.
मुंबई : हेमंत ढोमे आणि गौतमी पाटील ही जोडी सध्या चर्चेत आहे. अभिनेता आणि सूत्रसंचालक अमेय वाघ सध्या स्टार प्रवाहवरील 'शिट्टी वाजली रे' या कुकिंग शोचं अँकरिंग करत आहे. या शोमध्ये गौतमी आणि हेमंत सहभागी झाले होते. यावेळी अमेयने दोघांविषयी एक मजेशीर पण खरा किस्सा उलगडला. गौतमी पाटीलची तर चांगलीच पोलखोल केली.
अमेयने सांगितले की, पहिल्या नजरेत या जोडीकडे पाहून वाटतं की गौतमीला स्वयंपाक उत्तम जमतो आणि हेमंतला नाही. पण प्रत्यक्षात चित्र उलट आहे. हेमंत ढोमे उत्तम स्वयंपाक बनवतो तर गौतमीला अगदी नुडल्ससुद्धा करता येत नाहीत. इतकंच नाही तर गौतमीने जेव्हा चुलीवर भाकरी बनवतानाचे फोटो शेअर केले तेव्हा अमेयला वाटलं की ती फोटो फक्त दाखवण्यासाठी काढले असावेत.
advertisement
एबीपी माझाशी बोलताना अमेय वाघ म्हणाला, "हेमंत ढोमे आणि गौतमी पाटील ही एक जोडी होती. गौतमी पाटीलला आपण भारी डान्स वगैरे करताना बघितलं आहे. तिच्या कार्यक्रमांना एवढी गर्दी होते वगैरे आणि ती खूप कॉन्फिडेन्टली या सगळ्या गोष्टी करते. हेमंत ढोमे हा खूप मोठा दिग्दर्शक आहे. चांगला अभिनेता आहे. ही जोडी पाहून आपल्याला काय वाटतं की गौतमीला चांगला स्वयंपाक करता येत असावा आणि हेमंतला काही येत नसेल. पण सगळं उलटं होतं. हेमंतला सगळा स्वयंपाक येतो आणि गौतमीला काहीही येत नव्हतं. गौतमीला मी विचारलं की तुला काय करता येतं? ती म्हणाला, मला नुडल्स देखील बनवता येत नाहीत. तिने चुलीवर भाकरी बनवतानाचे फोटो वगैरे शेअर केले होते. पण मला वाटत नाही ते तिने असेल काढले होते. पण आता तिची पोलखोल झाली आहे."
advertisement
ती पुढे म्हणाली, "आता हेमंत दादा जे सांगतील तेच मी पुढे ऐकणार आहे. मग आम्ही म्हटलं की असं नाही चालणार कारण किचनमध्ये काम करणं ही सोपी गोष्ट नाहीये. ते मल्टी टास्किंग असतं". अमेय वाघबद्दल सांगायचं झाल्यास शिट्टी वाजली रे कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास 10 वर्षांनंतर त्याने टीव्ही विश्वात पुनरागमन केलं आहे."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 06, 2025 9:04 AM IST