बॉलिवूड आणि साऊथ हिरोंचं काय घेऊन बसलात, हा मराठी सुपरस्टार वयाच्या 52 व्या वर्षी लुटतोय लाइमलाइट, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूड आणि साऊथ हिरोंचं काय घेऊन बसलात मराठीतील सुपरस्टार्सवर प्रेक्षक आजही तितकंच प्रेम करतात. वयाच्या 52 व्या वर्षी हा सुपरस्टार आपल्या 20 वर्ष जुन्या गाण्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधताना दिसला.
बॉलिवूड आणि साऊथ हिरोंची क्रेझ कायमच प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. बॉलिवूडमध्ये शाहरुख, सलमान, अमिताभ बच्चन असोत किंवा साऊथमध्ये रजनीकांत, अल्लू अर्जून, महेश बाबू ते विजय थलापती यांची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक वेडे होतात. सुपरस्टार्सच्या घराबाहेर चाहते गर्दी करतात. पण बॉलिवूड आणि साऊथ हिरोंचं काय घेऊन बसलात मराठीतील सुपरस्टार्सवर प्रेक्षक आजही तितकंच प्रेम करतात. वयाच्या 52 व्या वर्षी हा सुपरस्टार आपल्या 20 वर्ष जुन्या गाण्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधताना दिसला.
सावरखेड एक गाव, यंदा कर्तव्य आहे, आई शप्पथ, रिंगा रिंगा, चेकमेट, दुनियादारी, क्लासमेट, डबल सीट, ती सध्या काय करते, दगडी चाळ, गुरू सारख्या एक ना अनेक सिनेमातून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. मराठीतील पहिला सुपरस्टार होण्याचा मान अंकुशनं मिळवला. आज 20-25 वर्षानंतरही अंकुश चौधरीची क्रेध कायम आहे.
advertisement
अंकुश चौधरीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अंकुश चौधरी त्याच्या 20 वर्ष जुन्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. अंकुश चौधरी नुकत्याच एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याने 2006 साली आलेल्या जत्रा सिनेमातील ये गो ये मैना या गाण्यावर डान्स केला. ये गो ये मैना गाण्यातील आयकॉनिक हुक स्टेपवर अंकुश चौधरी थिरकला.
advertisement
advertisement
अंकुश चौधरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अंकुश चौधरी स्टेजवर असताना समोर उभ्या असलेल्या प्रेक्षकांमध्ये त्याची अजूनही किती क्रेझ आहे हे पाहायला मिळालं. या गाण्यात अंकुश चौधरीबरोबर अभिनेत्री दिपाली सय्यद थिरकली होती. जत्रा सिनेमात अंकुश चौधरीने गाण्यापुरता कॅमियो केला होता. त्याचं हे गाणं सुपरहिट ठरलं. आजही त्या गाण्याची आणि अंकुशची ती हुकस्टेज सुपरहिट आहे.
advertisement
अंकुशला पाहून त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स करत त्याचं कौतुक केलं आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, 'अंकुश दादा तर अजून पण तसाच बहारदार वाटतो', दुसऱ्यानं लिहिलंय, 'मराठीमधला खरा सुपरस्टार'.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2025 9:45 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बॉलिवूड आणि साऊथ हिरोंचं काय घेऊन बसलात, हा मराठी सुपरस्टार वयाच्या 52 व्या वर्षी लुटतोय लाइमलाइट, VIDEO










