आर्यन खान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, पबमधला आक्षेपार्ह VIDEO व्हायरल
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Aryan Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चाहत्यांसमोर आर्यन खान आक्षेपार्ह कृती करताना पाहायला मिळत आहे.
Aryan Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लाडका लेक अर्थात आर्यन खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आर्यन खान सध्या बेंगळुरूमध्ये आहे. बेंगळुरूतील पबमधील त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरुख खानचा मुलगा अशी ओळख मिळवण्यासह 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या माध्यमातून आर्यन खानने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहरुखप्रमाणेच आर्यनचाही एक मोठा चाहतावर्ग आहे. आर्यन खान बेंगळुरूमध्ये आलेला असताना त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तो असलेल्या पब परिसरात गर्दी केली होती. यावेळी चाहत्यांसोबत संवाद साधण्यापेक्षा आर्यन त्यांच्यासोबत आक्षेपार्ह कृती करताना दिसून आला. त्यामुळे आर्यन खान सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. आर्यनचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी त्याला चांगलंच सुनावत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
आर्यन खान 28 नोव्हेंबर 2025 रोजी बेंगळुरूमधील एका पबच्या 'डी'याव्होल आफ्टर डार्क या इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी अनेक कलाकारमंडळीदेखील पबमध्ये उपस्थित होती. दरम्यान आर्यनला पाहून चाहत्यांनी आवाज केला. त्यावेळी पबच्या बाल्कनीत उभं राहून आर्यन खान चाहत्यांना मधलं बोट दाखवत आक्षेपार्ह वर्तन करताना दिसून आला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
Actor #ShahRukhKhan’s son #AryanKhan recently visited #Bengaluru. He had come to the city for a private event but ended up causing controversy.
Fans had gathered at a pub to see him, and during this time, he showed his middle finger in public.
A video of the incident has gone… pic.twitter.com/HfRIgrLapK
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) December 4, 2025
advertisement
आर्यनने हे आक्षेपार्ह वर्तन केलं त्यावेळी या कार्यक्रमात त्याच्यासोबत मंत्री जामीर अहमद थान यांचा मुलगा झैद खान आणि हॅरिस यांचा मुलगा नलपाडदेखील उपस्थित होता. मोहम्मद नलपाडसोबत आर्यन खान त्या पबमध्ये आला होता. आर्यन खानच्या आक्षेपार्ह कृतीवर झैद खान आणि मोहम्मद नलपाड यांनी हसत हसत त्यावर प्रतिक्रिया दिली. आर्यन खानच्या या वर्तनावर सध्या खूप टीका केली जात आहे. त्याने उपस्थित लोकांसोबत गैरवर्तन केलं असूनही त्याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. नेटकरी बेंगळुरू पोलिसांना टॅग करत आर्यनवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
advertisement
पोलिसांनी पबच्या व्यवस्थापकाची जवळपास तासभर चौकशी केली आणि सीसीटीव्ही फुटेजचे पुनरावलोकन केले. आर्यन खानच्या वागणुकीला काय कारण होते हे समजण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पण अद्याप नक्की कारण समोर आलेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानने सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन केल्याचं तपासात सिद्ध झाल्यास ते त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू इच्छितात.
आर्यन खानची 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही पहिली वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली होती. या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा आर्यन खानने सांभाळली होती. या सीरिजमध्ये शाहरुखसह अनेक बॉलिवूडकर झळकले होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2025 9:54 AM IST


