Varsha Bhosle : आशा भोसले यांच्या मुलीनं आत्महत्या करत संपवलं होतं आयुष्य; काय होतं कारण?

Last Updated:

नेहमी चेहऱ्यावर आनंद घेऊन वावरणाऱ्या आशा ताईंनी वैयक्तिक आयुष्यात मात्र खूप दुःख झेललं आहे. त्यांच्या मुलीने 08 ऑक्टोबर 2012 आत्महत्या करत स्वतःचं आयुष्य संपवलं होतं. जाणून घ्या आशा भोसले यांच्या मुलीनं इतका टोकाचा निर्णय का घेतला होता.

आशा भोसले
आशा भोसले
मुंबई, 08 ऑक्टोबर :  आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांनाच संमोहित करणाऱ्या ज्येष्ठ गायिका म्हणजे आशा भोसले होय. मंगेशकर घराण्याच्या गायनाचा वारसा तितक्याच प्रतिष्ठेने त्या आज चालवत आहेत. आशाताईंना नेहमीच त्यांच्या मनमोकळ्या आणि विनोदी स्वभावासाठी ओळखले जाते. पण नेहमी चेहऱ्यावर आनंद घेऊन वावरणाऱ्या आशा ताईंनी वैयक्तिक आयुष्यात मात्र खूप दुःख झेललं आहे. त्यांच्या मुलीने 08 ऑक्टोबर 2012 आत्महत्या करत स्वतःचं आयुष्य संपवलं होतं. जाणून घ्या आशा भोसले यांच्या मुलीनं इतका टोकाचा निर्णय का घेतला होता.
आशा भोसले यांच्या मुलीचं नाव वर्षा भोसले असं होतं. वर्षा भोसले हिचं सुरुवातीचे शिक्षण हिल ग्रेंज हायस्कूल, पेडर रोड, मुंबई येथे झालं होतं. त्यानंतर तिने मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, वर्षा यांनी पत्रकार म्हणून काम केलं. त्यांनी 1997 ते 2003 या काळात वेब पोर्टल रेडिफसाठी अनेक लेख लिहिले. यानंतर वर्षाने 1994 ते 1998 पर्यंत द संडे ऑब्झर्व्हरसाठी काम केले. याशिवाय त्यांनी जेंटलमन मॅगझिन आणि द टाइम्स ऑफ इंडियामध्येही काम केले.
advertisement
अखेर इस्राइलहुन मायदेशी सुखरूप परतली नुसरत भरुचा; प्रतिक्रिया देत म्हणाली 'मी सध्या खूप अस्वस्थ...'
वर्षा भोसले यांनाही लहानपणापासून संगीताची आवड होती. घरातून मिळालेला संगीताचा वारसा त्यांनी आपल्या करिअरमध्येही सामावून घेतला. वर्षा हिंदी आणि भोजपुरी गाणी म्हणायची. याशिवाय त्यांनी आई आशा भोसले यांच्यासोबतही अनेक परफॉर्मन्स दिले. देव आनंद स्टारर लूटमार या चित्रपटातील 'हंस तू हरदम' या गाण्यात वर्षाचा आवाज वापरण्यात आला होता. हे गाणे खूप प्रसिद्ध झाले. वर्षा भोसलेने क्रीडा लेखक आणि जनसंपर्क व्यावसायिक हेमंत केंकरे यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, 1998 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
advertisement
वर्षा भोसले या नैराश्यात होत्या. तिचा जवळचा मित्र गौतम राजदक्ष यांच्या निधनानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडली होती. अशा स्थितीत 9 सप्टेंबर 2008 रोजी त्यांनी बंदी असलेल्या औषधाचा ओव्हरडोज घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र यातून तिला वाचवण्यात आलं होतं. यानंतर तिने पुन्हा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. 8 ऑक्टोबर 2012 रोजी वर्षाने परवाना असलेल्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. वर्षाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं यामागे अनेक कारणं दिली जातात.
advertisement
वर्षा यांच्या एका जवळच्या मैत्रिणीने सांगितले की, वर्षाला आयुष्यभर समस्यांचा सामना करावा लागला. ती लहान असतानाच तिच्या आईचा घटस्फोट झाला. यानंतर आशा भोसले यांनी दुसरे लग्न केले. त्याचवेळी वर्षाचं वैवाहिक आयुष्यही फारसं चांगलं नव्हतं. आशा भोसले यांची मुलगी असल्याचं वर्षावर नेहमीच दडपण असायचं, असं काही लोक म्हणायचे. मात्र, याबाबत कधीच काहीही समोर आले नाही. मंगेशकर घराण्याची दुसरी पिढी विशेष काही करू शकली नाही, असे म्हणतात. वर्षा यांनी ही गोष्ट खूपच मनाला लावूनघेतली होती. याच कारणामुळे वर्षाने गाणेही सोडल्याचं म्हटलं जातं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Varsha Bhosle : आशा भोसले यांच्या मुलीनं आत्महत्या करत संपवलं होतं आयुष्य; काय होतं कारण?
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement