प्रेग्नंट भारती सिंह रुग्णालयात दाखल? VIDEO व्हायरल होताच चाहत्यांकडून चिंता व्यक्त
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bharti Singh Singh Hospital Video : प्रेग्नंट भारती सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कॉमेडियन रुग्णालयात दाखल असल्याचं पाहायला मिळत आहे.
Bharti Singh : कॉमेडियन भारती सिंह सध्या आपला प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत आहे. भारती प्रेग्नंसीच्या तिसऱ्या स्टेजला असून कामावरही तेवढंच लक्ष देताना दिसून येत आहे. पापाराझी अनेकदा भारती सिंहला बाळाबाबत प्रश्न विचारताना दिसून येतात. भारतीदेखील त्यांना आपल्या मजेदार अंदाजात उत्तर देते. भारती सिंहला एक मुलगी व्हावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. दरम्यान भारती सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या व्हिडीओमध्ये भारती सिंह रुग्णालायात दाखल असलेली पाहायला मिळत आहे. भारतीची ही हालत पाहून चाहते मात्र चिंतेत आहेत.
भारती सिंहची प्रकृती खालावली?
भारती सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारती रुग्णालयातील स्ट्रैचरवर झोपलेली दिसत आहे. तसेच तिची प्रकृतीदेखील खालावलेली पाहायला मिळत आहे. प्रेग्नंट झाल्यापासून भारती सिंहला प्रकृतीसंबंधित अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिच्या चेहऱ्यावर तिला होणारा त्रास स्पष्ट दिसून येतो.
भारती सिंहच्या त्या व्हिडीओमागचं सत्य
भारती सिंहच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काही चाहते या व्हिडीओवर भारतीला मुलगी व्हावी, असं म्हणत आहेत. पण खरंतर भारती सिंहचा हा व्हिडीओ जुना आहे. हा व्हिडीओ भारती सिंहच्या पहिल्या प्रेग्नंसीदरम्यानचा आहे. दुसरीकडे भारतीच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची वेळ आता जवळ आली आहे. भारती सिंह चाहत्यांना कोणत्याही क्षणी गुडन्यूज देऊ शकते.
advertisement
advertisement
भारती सिंहला जुळी मुलं होणार?
view commentsभारती सिंह जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. भारतीने आपल्या व्लॉगमध्ये जुळ्या मुलांबाबत एक प्रश्न विचारला होता. त्यानंतर हर्ष प्रचंड खुश झाला होता. जुळी मुलं झाली तर मी आणखी आनंदी होईल, असं हर्ष म्हणाला होता. त्यानंतर भारती सिंह म्हणते की जुळी मुलं होणार नाहीत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 3:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रेग्नंट भारती सिंह रुग्णालयात दाखल? VIDEO व्हायरल होताच चाहत्यांकडून चिंता व्यक्त


