मुक्ताईनगरमध्ये जोरदार राडा, रक्षा खडसे-चंद्रकांत पाटील पोलीस ठाण्यात, नेमकं काय घडलं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जाऊन भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी, जळगाव: भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. मतदान केंद्रांवर गोंधळ घालून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आमदार चंद्रकांत पाटील यांनी आरोप केला.
मतदानादिवशी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून काही शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याविषयी देखील चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांकडून माहिती घेतली.
मुक्ताईनगरमध्ये नेमकं काय घडलं?
नगर परिषद निवडणुकीच्या दिवशी अर्थात मंगळवारी मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा झाला. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा दावा करीत काही शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
advertisement
त्यानंतर बुधवारी आमदार चंद्रकांत पाटील यांनीही मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांच्या जत्थ्यासह जाऊन शिवसेना कार्यकर्त्यांची देखील तक्रार घ्यावी, असे पोलिसांना म्हटले. तसेच
शिवसैनिकांना मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार चंद्रकांत पाटलांनी लावून धरली.
मंगळवारी 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान
राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान झाले. तसेच सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी आता 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
advertisement
तदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष मतदान समाप्तीच्या अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत
राज्यातील सर्व 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्याचबरोबर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान समाप्तीच्या अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगानेही संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
December 03, 2025 3:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुक्ताईनगरमध्ये जोरदार राडा, रक्षा खडसे-चंद्रकांत पाटील पोलीस ठाण्यात, नेमकं काय घडलं?


