अंकिता लोखंडेनं पती विकीबाबत केला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा.. व्यूअर्स म्हणाले धक्कादायक!

Last Updated:

आतापर्यंत कधीच समोर न आणलेल्या एका मोठ्या गोष्टीचा खुलासा अभिनेत्री अंकिता लोखंडेनं केला आहे. अंकितानं ही गोष्ट सांगितल्यानंतर सगळे शॉक झालेत.

ankita lokhande and vicky jain
ankita lokhande and vicky jain
मुंबई, 13 डिसेंबर : बिग बॉस 17 सध्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात ऐकीकडे प्रेमाचा रंग चढताना दिसतोय तर दुसरीकडे काही नाती खराब होताना दिसत आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विक्की जैन हे मॅरिड कपल घरात आलं तेव्हा ते सर्वांना आयडिअल कपल वाटत होतं. पण घरात जाताच त्यांच्यातील खऱ्या गोष्टी सर्वांसमोर आल्या. नॅशनल टेलिव्हिजनवर अंकिता आणि विक्की कचाकचा भांडताना दिसत आहेत. दोघांची भांडणं पाहून चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान अंकितानं विक्कीच्या आतापर्यंत कधीच समोर न आणलेल्या एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे घरातील इतर सदस्यांबरोबर गप्पा मारत असते. तेव्हा ती सांगते की विक्कीने तिला प्रपोज केल्यानंतर एक वर्षासाठी तो गायब झाला होता. अंकितानं हे सांगितल्यानंतर सगळे तिला तिच्या आणि विक्कीच्या लव्हस्टोरीबद्दल विचारतात.
अंकितानं सांगितलं, 'आमच्यात प्रपोज असं काही झालं नव्हतं. विक्कीनं मला थेट लग्नाची मागणी घातली होती'. विक्की घर सोडून गेला तेव्हा तू त्याची वाट पाहिलीस का? असं घरातले विचारतात. त्यावर अंकिता सांगते, 'हो तो एक वर्षांसाठी गायब झाला होता. पण एक वर्षांनी तो जेव्हा परत आला तेव्हा आम्हाला माहिती होतं की आम्ही लग्न करणार आहोत. विक्की तेव्हा माझ्यामुळे निघून गेला होता'.
advertisement
विक्कीआधी अंकिताचं दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर अफेअर होतं. दोघे अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. पवित्र रिश्ता या मालिकेदरम्यान ते प्रेमात पडले. दोघे लिव्ह-इनमध्ये राहत होते. सुशांतबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताला विक्कीनं त्यातून बाहेर काढलं असं तिनं अनेकदा सांगितलं आहे.
विक्की आणि अंकिता यांनी 14 डिसेंबर 2021 रोजी लग्न केलं. दोघांनी मुंबईत ग्रँड वेडिंग केली होती. दोघांनी लग्नासाठी जवळपास 50 कोटी रूपयांहून अधिक खर्च केला होता. एकता कपूरनं अंकिताला लग्नात गिफ्ट म्हणून डायमंड दिले होते. ज्याची किंमत जवळपास 50 लाख रूपये होती.
मराठी बातम्या/मनोरंजन/
अंकिता लोखंडेनं पती विकीबाबत केला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा.. व्यूअर्स म्हणाले धक्कादायक!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement