Bigg Boss 19 : मालती चाहरने तान्या मित्तलची केली पोलखोल; म्हणाली,"फक्त पेटीकोट, ब्लाऊज घालायलाच..."

Last Updated:

Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19'च्या नव्या प्रोमोमध्ये मालती चाहर तान्या मित्तलबद्दल धक्कादायक दावे करताना दिसतेय. हे सगळं ऐकून एकीकडे घरचे सदस्य हैराण होतात, तर दुसरीकडे अभिषेक बजाजला मोठा धक्का बसतो.

News18
News18
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम प्रत्येक दिवसागणिक अधिकच नाट्यमय होत चाललाय. सलमान खान होस्ट करत असलेला हा रिअॅलिटी शो पहिल्याच दिवसापासून वाद, भांडणं आणि संघर्ष यामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो आहे. पण, जेव्हापासून मालती चाहरनं वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात प्रवेश केला आहे. तेव्हापासून तिनं बिग बॉस सीझन 19 च्या घरात भरपूर ड्रामा आणि गोंधळ घातला आहे. तिने येताच घरातील प्रत्येकाविषयी आपलं मत मांडलं आणि अनेक धक्कादायक खुलासे केले. दरम्यान, निर्मात्यांनी आता 'बिग बॉस 19' चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये मालती तिची सहस्पर्धक तान्या मित्तलबद्दल धक्कादायक दावे करताना दिसते आहे.
मालती चाहरने तान्या मित्तलबद्दल केला धक्कादायक दावा
'बिग बॉस 19' या कार्यक्रमातील स्पर्धक मालतीनं खुलासा केला की तान्या स्वतःला एका वेगळ्या प्रकारे सादर करते. पण खऱ्या आयुष्यात ती मिनी स्कर्टसुद्धा घालते. 'बिग बॉस 19' च्या प्रोमोची सुरुवात मालतीच्या या विधानाने होते की तान्या स्वतःला सती सावित्रीसारखी सादर करते. पुढे ती अभिषेक बजाजला विचारते की घरातील सदस्य तिच्याबद्दल काय विचार करतात. जेव्हा अभिषेक सांगतो की तान्या संस्कारी वाटते आणि ती साडी घालते, तेव्हा मालती म्हणते की घरातल्यांना फक्त तिची एकच बाजू माहिती आहे. मालती पुढे म्हणते, "स्वतःला ज्या पद्धतीने ती सादर करते, त्यापेक्षा ती पूर्णपणे वेगळी आहे. एक व्हिडीओ तिने शेअर केलेला ज्यात फक्त पेटीकोट घातलेला पाहायला मिळतोय, ब्लाऊज वगैरे काही नाही"
advertisement
advertisement
‘बिग बॉस 19’ मधील मालती पुढे म्हणाली,“मिनी स्कर्टमध्येही हिचे व्हिडिओ आहेत.” तिनं तान्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल आणखी एक धक्कादायक दावा केला. या खुलाशांमुळे 'बिग बॉस 19' च्या घरातील सदस्य थक्क होतात. दुसरीकडे, अभिषेकला हे ऐकून खूप आश्चर्य वाटतं की ती एवढं खोटं कसं बोलू शकते. प्रोमोच्या शेवटी मालती तिच्या सहस्पर्धकांना सांगते की तान्या म्हणजे एक "मिम मटेरियल" आहे. कारण ती जे बोलते आणि खरी आहे त्यामध्ये खूप मोठा फरक आहे.
advertisement
'बिग बॉस 19'च्या घरात 'ड्रामा क्वीन' राखी सावंतची एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी राखीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये राखी म्हणत होती,"मी बिग बॉसच्या घरात जातेय. मला व्होट करा".
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19 : मालती चाहरने तान्या मित्तलची केली पोलखोल; म्हणाली,"फक्त पेटीकोट, ब्लाऊज घालायलाच..."
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement