Pro Kabaddi Death : प्रो कबड्डी लीगवर दु:खाचा डोंगर! यू मुंबाच्या खेळाडूसह जयपूर पिंक पँथर सदस्याचा मृत्यू, धक्कादायक घटना

Last Updated:

Pro Kabaddi League Player Death : वेदांत देवाडिगा आणि यू मुंबाचा युवा खेळाडू बालाभारती यांनी अत्यंत कमी वयात या जगाचा निरोप घेतला.

Pro Kabaddi League Player Death
Pro Kabaddi League Player Death
Pro Kabaddi League Player Passed Away : दिवाळीच्या तोंडावर सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना कबड्डीच्या मैदानातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जयपूर पिंक पँथर्सचे असिस्टंट मॅनेजर वेदांत देवाडिगा आणि यू मुंबाचा युवा खेळाडू बालाभारती यांच्या निधनाने प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi League) शोककळा पसरली आहे. दोन्ही खेळाडूंचं लहान वयातच निधन झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

अत्यंत कमी वयात जगाचा निरोप

वेदांत देवाडिगा आणि यू मुंबाचा युवा खेळाडू बालाभारती यांनी अत्यंत कमी वयात या जगाचा निरोप घेतला. यू मुंबाच्या बालाभारती यांचं वय 20 वर्षे होती, तर जयपूर पिंक पँथर्सच्या वेदांत यांचं वय 23 वर्षे होती. दिवाळीच्या दिवशी मिळालेल्या या दुहेरी दुःखद बातमीमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
advertisement
advertisement

वेदांत यांच्या अकाली निधनाने धक्का

जयपूर पिंक पँथर्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लिहिले की, "जयपूर पिंक पँथर्स परिवार आमचे सहाय्यक मॅनेजर वेदांत देवाडिगा यांच्या अकाली निधनाने अत्यंत दुःखी आहे. ते आमच्या फॅमिलीचे प्रिय सदस्य होते; त्यांच्या पॅशन आणि समर्पणाची आम्हाला खूप आठवण येईल. या कठीण वेळी आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या प्रियजनांसोबत आहेत."
advertisement
advertisement

यू मुंबाची सोशल मीडियावर पोस्ट

तर, यू मुंबाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लिहिलं की, "या वर्षाच्या सुरुवातीला युवा मुंबाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बालाभारती यांच्या अकाली निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे. या अत्यंत कठीण वेळी आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबीय, फ्रेंड्स आणि टीमच्या सहकाऱ्यांसोबत आहेत."
advertisement

राईट कॉर्नर डिफेंडर

दरम्यान, बालाभारती यांचा जन्म 30 ऑक्टोबर 2005 रोजी पाँडिचेरी येथे झाला होता आणि लहानपणापासूनच त्यांना खेळामध्ये रुची होती. 15 वर्षांच्या एजमध्ये त्यांनी कबड्डीचे ट्रेनिंग घेणे सुरू केले. त्यानंतर बालाभारतीने राईट कॉर्नर डिफेंडर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी आतापर्यंत 33 मॅचेस खेळल्या होत्या, ज्यात त्यांच्या नावावर 55 पॉइंट्सची नोंद आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pro Kabaddi Death : प्रो कबड्डी लीगवर दु:खाचा डोंगर! यू मुंबाच्या खेळाडूसह जयपूर पिंक पँथर सदस्याचा मृत्यू, धक्कादायक घटना
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement