ॲक्टिंग नाही, तर 'या' क्षेत्रात काम करत होता रितेश देशमुख; एका घटनेने बदललं भाऊचं आयुष्य, नेमकं काय घडलेलं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Riteish Deshmukh Bigg Boss Marathi 6: नुकत्याच एका मुलाखतीत रितेशने आपल्या आयुष्यातील त्या खास क्षणाबद्दल खुलासा केला, ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं.
मुंबई: अभिनेता रितेश देशमुख म्हणजे महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक हरहुन्नरी कलाकार. सध्या रितेशच्या नावाची चर्चा आहे ती 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वामुळे. पण तुम्हाला माहिती आहे का, की आज ग्लॅमरच्या जगात वावरणारा हा अभिनेता खरं तर आर्किटेक्ट म्हणून नकाशे आणि इमारतींच्या जगात आपलं भविष्य शोधत होता? नुकत्याच एका मुलाखतीत रितेशने आपल्या आयुष्यातील त्या खास क्षणाबद्दल खुलासा केला, ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं.
रितेशने आपल्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं की, तो मूळ अभिनेता नाही तर एक आर्किटेक्ट आहे. त्याने आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलं, स्वतःचं प्रोफेशनल ऑफिस सुरू केलं आणि तो कामात व्यग्रही झाला होता. नकाशे काढणं आणि वास्तूंचे आराखडे तयार करणं हेच त्याचं जग होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
रितेशच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट
advertisement
रितेश म्हणतो, "प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतो, जो तुमच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलून टाकतो. माझ्या आयुष्यात तो क्षण तेव्हा आला, जेव्हा मला एका हिंदी चित्रपटात काम करण्याची अनपेक्षित संधी मिळाली. ते नशिबाचं दार होतं, आणि मी ते उघडण्याचा निर्णय घेतला. तिथून जे सुरू झालं, ते आज तुमच्या समोर आहे."
advertisement
advertisement
रितेशने २००३ मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. याच चित्रपटाच्या सेटवर त्याला त्याची 'लाईफ पार्टनर' जिनिलीया भेटली. सुरुवातीला शांत वाटणाऱ्या रितेशच्या करिअरला २००४ च्या 'मस्ती' चित्रपटाने मोठी गती दिली आणि तो प्रेक्षकांचा लाडका झाला. मराठीत 'लय भारी'तून त्याने जी एन्ट्री केली, त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
advertisement
आता पुन्हा एकदा भाऊचा धक्का
गेल्या वर्षी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात रितेशने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आणि प्रेक्षकांनी त्याला अक्षरश: डोक्यावर घेतलं. आता ११ जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या सहाव्या पर्वात रितेश पुन्हा एकदा होस्ट म्हणून आपल्या भेटीला येत आहे. आता या नवीन पर्वात रितेश कोणत्या नवीन स्टाइलमध्ये स्पर्धकांची शाळा घेणार, हे पाहण्यासाठी अवघा महाराष्ट्र उत्सुक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 9:11 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
ॲक्टिंग नाही, तर 'या' क्षेत्रात काम करत होता रितेश देशमुख; एका घटनेने बदललं भाऊचं आयुष्य, नेमकं काय घडलेलं?











