हेमा मालिनी यांना पटवण्यासाठी धर्मेंद्र यांनी सेटवर केलेला जुगाड, स्पॉट बॉयला करायला लावायचे ही गोष्ट

Last Updated:

Dharmendra Hema Malini Love Story : अभिनेते धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांना प्रेमात पाडण्यासाठी शोले चित्रपटाच्या सेटवर अनेक प्रयत्न केले होते. चक्क त्यांनी पैशाचाही उपयोग केला होता.

News18
News18
'शोले' चित्रपट खूपच गाजला होता. त्यातील अनेक सुपरहिट डायलॉग, गाणी आणि कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. या चित्रपटाला चक्क 50 वर्ष झाली आहेत. त्यामुळे हा चित्रपट पुन्हा नव्याने चित्रपटगृहात लवकरच रिलीज होणार आहे. बॉलिवूड मधील हा पहिला चित्रपट आहे जो रि-रिलीज होणार आहे. यात धर्मेंद्र, अमिताभ, हेमा मालिनी, जया हे दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. पण अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव स्टोरी इथूनच सुरु झाली होती.
या 'शोले' चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी अनेक किस्से घडले होते. जे आता इतक्या वर्षांनंतर बाहेर आले आहेत. या चित्रपटाच्या अगोदरपासूनच अभिनेते धर्मेंद्र हे हेमाच्या प्रेमात होते. पण हेमाला स्वतःच्या प्रेमात पाडण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी खूप पैसाही खर्च केला होता. हा चित्रपट त्यांच्या या प्रेमासाठी निमित्त होता.
advertisement
कशी सुरु झाली हेमा आणि धर्मेंद्र यांची लव स्टोरी ?
'शोले' चित्रपटाच्या शूटिंगवेळी हेमा आणि धर्मेंद्र यांचा हा प्रेमाचा अँगल सुरु झाला होता. धर्मेंद्र हेमा मालिनीसोबत जास्त वेळ घालवण्यासाठी वेगवेगळे अनेक वाकडे तिकडे प्लॅन बनवले होते. हेमा सोबतच्या रोमँटिक सीनला त्यांनी अनेक कारणे काढून रिटेक घेऊन ते सीन लांबवले होते. त्यांचे असे असायचे की काहीही करुन सीन लांबवायचा आणि सेटवर हेमा सोबत जास्त वेळ कसा घालवता येईल ते पाहायचे. यासाठी ते चक्क स्पॉट बॉयची मदत घ्यायचे आणि स्पॉटला पैसेही द्यायचे.
advertisement
हेमासाठी धर्मेंद्रने खर्च केले चेक्क इतके रुपये..
अभिनेते धर्मेंद्र यांनी हेमाला प्रेमात पाडण्यासाठी शोले चित्रपटाच्या सेटवरती पैशांचा उपयोग केला होता. शूटिंगमध्ये एक सीन होता, ज्यात धर्मेंद्र हेमाला बंदूक चालवायला शिकवत असतात. या सीनला ते हेमाच्या एकदम जवळ येतात. त्यामुळे या सीनला धर्मेंद्र थोडा जास्त वेळ घेत होते. कारण सीनला ते काही न काही चूक करतील किंवा काहितरी सामान सेटवरती पाडतील. त्यामुळे तो सीन पुर्ण करण्यासाठी उशीर लागेल. धर्मेंद्रनी त्यासाठी स्पॉट बॉयला दोन हजार रुपये दिले होते. जेणेकरुन काही न काही कारणाने सीन पुर्ण करायला उशीर होईल. धर्मेंद्र यांच्या या प्रयत्नांवर हेमा खूपच खूश झाल्या होत्या. त्यानंतर इथून त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरु झाला.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
हेमा मालिनी यांना पटवण्यासाठी धर्मेंद्र यांनी सेटवर केलेला जुगाड, स्पॉट बॉयला करायला लावायचे ही गोष्ट
Next Article
advertisement
Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement