मधुबालासोबत रोमान्स, शेवटी पोटच्या मुलांनी वाऱ्यावर टाकलं; चटका लावणारा होता अभिनेत्याच्या आयुष्याचा शेवट
- Published by:Suraj Yadav
 
Last Updated:
Bollywood Superstar Actor : या अभिनेत्याने मधुबाला आणि मीना कुमारीसोबत खूप सिनेमे केले. मोठ्या पडद्यावर राजा-महाराजांच्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याच्या आजारपणामध्ये मुलांनी त्याची साथ सोडली.
या अभिनेत्याने कित्येक सिनेमे हिट देऊन चाळीस वर्षे  तो सुपरस्टार राहिला होता. पण त्यांच्या आयुष्यात असे काही उलटे फासे पडले की होत्याचे नव्हते झाले. खऱ्या जीवनात त्यांना कुटूंबाचे प्रेम कधीच मिळाले नाही. त्यांना लहान असतानाच अभिनयाची आवड होती. त्यांनी बॉलिवूडच नाही तर बंगाली सिनेमामध्येही आपली चमक दाखवली होती.
आजारपणात मुलांनी साथ सोडली
या बॉलिवूड अभिनेत्याचे नाव आहे प्रदिप कुमार. त्यांनी 1952 मध्ये आलेला सिनेमा 'आनंद मठ' मधून डेब्यू केले होते. त्यांनी अनेक भूमिका या अजरामर करुन भूमिकेला योग्य न्याय दिला होता. पण कुटूंबाची योग्य साथ त्यांना मिळाली नाही. या सिनेसृष्टीत त्यांना चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. त्यांना पॅरालिसीस झाल्यानंतर त्यांच्या मुलांना त्यांनी सोडून दिले. पण त्यांनी त्याची तक्रार कधीच केली नाही. ते एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की, "माझ्या पत्नीचे निधन झाले. माझ्या तीन मुली म्हणजेच बीना, रिना , मीना आणि मुलगा प्रसाद यांनी मला माझ्या पत्नीचे निधन झाल्यानंतरही तिच्याशी भेटायला दिले नव्हते."
advertisement
मधुबाला आणि मीना कुमारी यांचा हिरो
अदाकारी, सुंदरता आणि अभिनय असा मिलाफ असलेल्या या दोन अभिनेत्री. यांच्यासोबत प्रदिप कुमार यांनी आठ सिनेमे एकत्र केले. ज्यात 'राज हठ', 'शिरीन-फरहाद', 'यहूदी की लड़की', 'चित्रलेखा', 'बहु-बेगम', आणि 'भीगी रात' सारख्या सिनेमांचा समावेश आहे. तसेच प्रदिप कुमार यांनी अमिताभ बच्चन, सनी देओल आणि मनोज कुमार यांसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले होते. ते कायमच आपल्या चाहत्यांची मने अभिनयाने जिंकायचे.
advertisement
सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना 1999 मध्ये लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अभिनेते प्रदिप कुमार यांचे 27 ऑक्टोबर 2001 ला वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 11:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मधुबालासोबत रोमान्स, शेवटी पोटच्या मुलांनी वाऱ्यावर टाकलं; चटका लावणारा होता अभिनेत्याच्या आयुष्याचा शेवट


