जुनं प्रेम अचानक आलं समोर अन्... रणबीरला पाहून दीपिकाला राहावलं नाही, सर्वांसमोरच केलं असं काही... VIDEO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ranbir Kapoor Deepika Padukone : रणबीर आणि दीपिका यांना विमानतळावर अगदी अनपेक्षितपणे एकत्र पाहिले गेले, ज्यामुळे त्यांचे चाहते खूप खुश झाले आहेत.
मुंबई : चित्रपट जगतातील सर्वात लाडकी आणि पडद्यावर हिट ठरलेली जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण. 'ये जवानी है दिवानी' असो वा 'तमाशा', त्यांची पडद्यावरची जादू आजही कायम आहे. आता तर या दोन स्टार्सनी सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे! रणबीर आणि दीपिका यांना विमानतळावर अगदी अनपेक्षितपणे एकत्र पाहिले गेले, ज्यामुळे ते दोघे पुन्हा एका मोठ्या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चांना मोठा वेग आला आहे.
एअरपोर्टवर भेट, मग दिली मिठी!
रणबीर आणि दीपिकाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये रणबीर सुरक्षा तपासणीसाठी विमानतळावर थांबतो. त्याचवेळी, आतमध्ये एका लहान गाडीवर दीपिका त्याला दिसली. दीपिकाने लगेचच रणबीरला हात उंचावून हॅलो केलं. रणबीरने लगेच तिला हात दाखवला आणि दीपिकानेही आपली गाडी थांबवली. त्यानंतर रणबीरही तिच्यासोबत त्या गाडीवर बसला. या दरम्यान रणबीर काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये आणि आरामदायी वेशात होता. तर दीपिका राखाडी रंगाच्या कपड्यांमध्ये आणि काळ्या चष्म्यात नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती.
advertisement
विमानतळाच्या बाहेर पडतानाचा दोघांचा आणखी एक भावनिक क्षण कॅमेरात कैद झाला आहे, ज्यात दोघेही एकमेकांना प्रेमाने गळाभेट करताना दिसले. यानंतर ते आपापल्या गाड्यांमध्ये बसून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले.
चाहत्यांना 'जवानी दिवानी २'ची आस!
रणबीर आणि दीपिकाला एकत्र पाहून त्यांचे चाहते खूप खुश झाले आहेत. सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमध्ये अनेकांनी ‘या जोडीने पुन्हा पडद्यावर एकत्र यावे’ अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर काही प्रेक्षकांनी थेट अंदाज लावला आहे की, “आता ‘ये जवानी है दिवानीचा दुसरा भाग’ बनत असावा!”
advertisement
advertisement
रणबीर सध्या नितेश तिवारींच्या ‘रामायण’ चित्रपटासाठी तयारी करत आहे. यात तो प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारणार असून, यश रावण आणि साई पल्लवी सीतामाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत येणार आहे. दुसरीकडे, दीपिका पदुकोण अभिनेता शाहरुख खानसोबत ‘राजा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यात सुहाना खानही मुख्य भूमिकेत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 1:06 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
जुनं प्रेम अचानक आलं समोर अन्... रणबीरला पाहून दीपिकाला राहावलं नाही, सर्वांसमोरच केलं असं काही... VIDEO VIRAL