'तुम्ही नालायक माणूस आहात!' शोलेतल्या सीनवरून जावेद अख्तर-लकी अलीमध्ये जुंपली, सोशल मीडियावरच काढली उणीधुणी

Last Updated:

Javed Akhtar-Lucky Ali controversy : जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादात लकी अली यांनी माफी मागितली पण पुन्हा टोला लगावला.

News18
News18
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यावर गायक लकी अली चांगलेच भडकले होते आणि त्यांनी जावेद अख्तर यांना 'नालायक माणूस' म्हटले होते. मात्र, आता वाद वाढल्यानंतर लकी अली यांनी जावेद अख्तर यांची माफी मागितली आहे, पण या माफीनाम्यातही त्यांनी जावेद अख्तर यांना टोला लगावला आहे.

नेमका वाद काय?

जावेद अख्तर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता, ज्यात ते म्हणत होते, "शोले चित्रपटात एक सीन होता, जिथे धर्मेंद्र शिवजीच्या मूर्तीच्या मागे लपून बोलतात आणि हेमा मालिनी यांना वाटते की शिवजी त्यांच्याशी बोलत आहेत. आज असा सीन शक्य आहे का? नाही, मी आज असा सीन लिहिणार नाही."
advertisement
या संदर्भात बोलताना जावेद अख्तर पुढे म्हणाले होते, "मी रेकॉर्डवर बोलत आहे. मी पुणे येथे एका मोठ्या प्रेक्षकांसमोर राजू हिरानीसोबत होतो आणि मी म्हणालो, 'मुसलमानांसारखे होऊ नका. त्यांना तुमच्यासारखे बनवा. तुम्ही मुसलमानांसारखे होत आहात. ही एक शोकांतिका आहे!'"

जावेद अख्तर यांच्या वक्तव्यानंतर लकी अलीचा पारा चढला

जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यावर लकी अली प्रचंड संतापले होते आणि त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली होती. लकी अली यांनी आधीच्या पोस्टमध्ये लिहिले होते, "जावेद अख्तरसारखे बनू नका, ते कधीच ओरिजिनल नव्हते आणि अत्यंत नालायक आहेत." या पोस्टमुळे वाद वाढल्यानंतर लकी अली यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये माफी मागितली आहे, पण तीही खोचक शब्दांत.
advertisement

माफीतही 'राक्षस' शब्दाचा वापर

लकी अली यांनी आपल्या लेटेस्ट 'X' पोस्टमध्ये लिहिले, "माझा अर्थ असा होता की, अहंकार वाईट असतो. ते आधीचे विधान माझ्याकडून चुकीच्या पद्धतीने गेले. राक्षसांनाही भावना असू शकतात आणि जर मी कोणाच्या दुष्टतेला दुखावले असेल, तर मी माफी मागतो."
advertisement
या पोस्टमध्ये लकी अली यांनी वरवर माफी मागितली असली तरी, 'राक्षस' आणि 'दुष्टता' यांसारख्या शब्दांचा वापर करून त्यांनी पुन्हा एकदा जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे. लकी अली यांनी आपली चूक मान्य केली असली तरी, त्यांच्या मनात जावेद अख्तर यांच्याबद्दलचा राग अजूनही कायम असल्याचे दिसत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तुम्ही नालायक माणूस आहात!' शोलेतल्या सीनवरून जावेद अख्तर-लकी अलीमध्ये जुंपली, सोशल मीडियावरच काढली उणीधुणी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement