कुमार सानूंनी Ex पत्नीला झापलं, एक्स्ट्रा मॅरिटलच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर; आता लढणार कायदेशीर लढाई
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Kumar Sanu controversy : रीटा भट्टाचार्य यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर व छळाच्या आरोपांमुळे संतापलेल्या कुमार सानूंनी रीटा यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवून कठोर भूमिका घेतली आहे.
मुंबई : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक कुमार सानू सध्या त्यांच्या गाण्यांमुळे नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील मोठ्या वादामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी कुमार सानूंच्या एक्स-वाईफ रीटा भट्टाचार्य यांनी एकापाठोपाठ एक मुलाखती देऊन त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आणि छळाचे सनसनाटी आरोप केले होते. आता या आरोपांमुळे संतापलेल्या कुमार सानूंनी रीटा यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवून कठोर भूमिका घेतली आहे.
रीटा भट्टाचार्य यांच्या आरोपांनंतर कुमार सानूंचं कायदेशीर पाऊल
आपल्या वकील सना रईस खान यांच्यामार्फत कुमार सानू यांनी एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी रीटा भट्टाचार्य यांचे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत आणि हे बदनाम करण्याचे निष्फळ प्रयत्न असल्याचं सांगितलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की, “गेल्या ४० वर्षांपासून कुमार सानूंनी त्यांच्या संगीतात आपलं जीवन ओतलं आहे, लाखो लोकांना आनंद दिला आहे आणि जगभरात प्रेम मिळवलं आहे.”
advertisement
पुढे स्पष्ट इशारा देत म्हटलं आहे की, “दुःखदायक खोट्या गोष्टी थोडा वेळ गोंधळ निर्माण करू शकतात, पण त्या एका महान कलाकाराचा वारसा कधीही मिटवू शकत नाहीत. त्यांच्या प्रतिष्ठेचे, वारशाचे आणि कुटुंबाच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी, बदनाम करण्याच्या या फालतू प्रयत्नांना कायद्याच्या पूर्ण बळाने सामोरे जाऊ.”
advertisement
नेमके कोणते आरोप केले होते?
रीटा भट्टाचार्य यांनी अनेक मीडिया पोर्टल्सला दिलेल्या मुलाखतींमध्ये दावा केला होता की, कुमार सानूंचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होते. याशिवाय, त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रेग्नेंसीच्या काळात रीटा यांना अतोनात त्रास दिला आणि त्यांना जेवण देणंही बंद केलं होतं. रीटा यांनी कुमार सानूंच्या बहिणीवर, वडिलांवर आणि पुतण्यांवरही त्यांच्या चारित्र्याबद्दल धक्कादायक दावे केले होते.
advertisement
या सगळ्या आरोपांमुळे त्रासलेल्या कुमार सानूंनी आता कायदेशीर पाऊल उचललं असून, त्यांनी रीटा यांना यापुढे असे कोणतेही खोटे दावे न करण्याची ताकीद दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 5:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
कुमार सानूंनी Ex पत्नीला झापलं, एक्स्ट्रा मॅरिटलच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर; आता लढणार कायदेशीर लढाई