इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचं आमिष दाखवून 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार; बॉलिवूडच्या फेमस संगीतकाराला मुंबईत अटक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूडच्या फेमस संगीतकाराविरोधाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून त्याने नको ते कृत्य केलं.
बॉलिवूडमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय संगीतकार जोडी सचिन आणि जिगर. त्यांच्यातील सचिन संघवी याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच आला आहे. हो 45 वर्षांचा असून त्याने एका 19वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्या लैंगिक अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. सचिन- जिगर ही बॉलिवूडची फेमस संगीतकार जोडी आहे. दोघांची अनेक गाणी हिट झाली आहे. त्यांच्याबाबत अशी माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
19 वर्षीय तरुणीने सचिन संघवी याच्यावर लग्नाचं आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार विलेपार्ले पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणाने संपूर्ण संगीतविश्वात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सचिन संघवी यांना अटक केली. त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं आहे. सध्या या तपासाची सूत्र सांताक्रूझ पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहेत.
advertisement
इंस्टाग्रामवर झालेली ओळख
तरुणीच्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये सचिन संघवीने तिला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला. 'तुला अल्बममध्ये संधी देतो', असं सांगत त्यांनी तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दोघांचे नंबर एक्सचेंज झाले. दोघांचं बोलणं वाढलं. त्यानंतर सचिनने तिला त्याच्या म्युझिक स्टुडिओत भेटायला बोलावलं. या भेटीत त्याने तिला लग्नाची मागणी घातली. लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला.
advertisement
जबरदस्तीने गर्भपात करायला लावला
तरुणीने आणखी गंभीर आरोप करत सांगितलं की, सचिनने तिला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला. त्यानंतर तिच्याशी असलेले सगळे संपर्क तोडले. वारंवार प्रयत्न करूनही प्रतिसाद न मिळाल्याने तिने अखेर पोलिसांकडे धाव घेतली.
सचिन-जिगरची जोडी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय
सचिन-जिगर ही जोडी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय संगीतकारांपैकी एक आहे. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी केली आहे. त्यांच्या गाण्यांमध्ये 'तेरे वासते', 'अपना बना ले', 'फिर और क्या चाहिए', 'गुलाबी, 'तैनू खबर नहीं' सारख्या गाण्यांचा समावेश आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 8:18 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचं आमिष दाखवून 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार; बॉलिवूडच्या फेमस संगीतकाराला मुंबईत अटक


