'बीडाची की नांदेडची', इंग्रजी बोलणाऱ्या मराठी मुलीला चिन्मयीनं 'रंगेहात' पकडलं, Must Watch Video
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Chinmayee Sumeet Marathi : अभिनेत्री चिन्मयी सुमीतने इंग्रजी बोलण्याच्या बेगडी प्रवृत्तीवर टीका केली. इंग्रजी बोलणाऱ्या एका मराठी मुलीचा किस्सा तिने सांगितला.
मुंबई : मराठी मालिका, सिनेमा, नाटकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री चिन्मयी सुमीत ही नेहमीच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आवाज उठवताना दिसते. सोशल मीडियावर ती वेळोवेळी मराठी भाषेचं महत्त्व अधोरेखित करते. हिंदी-मराठी भाषा वाद निर्माण झालेल्या प्रसंगांमध्येही तिनं ठामपणे मराठीचा पक्ष मांडला आहे. तिच्या या भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये ती केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर मराठी संस्कृती व भाषेच्या जपणुकीसाठी काम करणारी जबाबदार व्यक्ती म्हणूनही ओळखली जाते. चिन्मयीनं नुकत्याच एक भाषणात तिच्या घरात आलेल्या एका मराठी मुलीचा किस्सा सांगितला.
मराठी अभ्यास केंद्र या इन्स्टाग्राम पेजवरून चिन्मयीचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ज्यात चिन्मयीने एक प्रसंग सांगितला. चिन्मयी म्हणाली, "माझ्या घरी सुमीतचे कॉम्च्युम डिझाइन करायला एक मुलगी आली. ती मुलगी माझ्याशी सतत मॅम इंग्लीशच बोले. मी तिला विचारलं की, आय एम जस्ट हॅविंग टी, वुड यू लाइक सम टी. पण दोनदा ती नाही म्हणाली, त्यांचं काम संपतच नव्हतं. मी तिला शेवटी म्हटलं की प्लिज टेल मी नाऊ बिकॉज नाऊ आय हॅविंग माय सेकेंड कप ऑफ टी अँड यू नॉट हॅविंग एनी थिंग, यू आर हिअर इन लास्ट वन आवर. त्यानंतर त्या मुलीने चिन्मयीला हाफ कपल ब्लॅक कॉफी हवी आहे असं इंग्रजी सांगितलं."
advertisement
चिन्मयी पुढे म्हणाली, "मी कॉफी करायला जात होती तेवढ्यात तिचा फोन वाजला. ती मला म्हणाली, की आय एम सॉरी, आय हॅव टू गेट दिस. आणि ती म्हणाली, आग तिथेचय ना, तिथेचय ना. अग थैलीतय ना तिकडच्या, पांढऱ्या थैलीतय ना. मी वापस आले की देते तुला. मी वापस आले, देते तुला ऐकल्याबरोबर म्हटलं तिला, काय ग बिडाची की नांदेडची. तर मला म्हणाली, बिडाची. म्हटलं, कशाला मगापासून माझ्या तोंडाला फेस आणतेस इतका. कशासाठी."
advertisement
advertisement
"त्याच्याआधी ती मला म्हणाली होती, यु आर फॅब्युल्युअल इन सखाराम बाइंडर. आता सखाराम बाइंडर काय इंग्लीश बोलणारी मुलगी बघणार नाही. तर त्याच्यावरून मला असं झालं की, तुला माहितीये मी मराठी अभिनेत्री आहे. सुमीत राघव हा उत्तम मराठी बोलतो. मराठी नाटकातून कामं करतो. तू मराठीतली बिडाची मुलगी आहेस", असंही चिन्मयीने सांगितलं.
advertisement
चिन्मयी म्हणाली, "पण इंग्लीश बोललं की तुमचं स्टँडर्ड ठरतं तुमचं, म्हणून तुम्ही इंग्लीश बोलता. ही जी काही आपली विचार करण्याची बेगडी पद्धत आहे... मला कळतंच नाही की कोंबडी आधी की अंड आधी. समाजाची विचारधारा अशी बेगडी आहे म्हणून सरकार असं वागतं की सरकारची विचारधारा बेगडी आहे म्हणून समाज असा वागतो हे मला कळत नाही."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 2:02 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'बीडाची की नांदेडची', इंग्रजी बोलणाऱ्या मराठी मुलीला चिन्मयीनं 'रंगेहात' पकडलं, Must Watch Video