हिट चित्रपट दिले, मग स्टारडमला घाबरला अभिनेता, फेमस होण्याच्या भीतीने परदेशात गेला पळून
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
इंडस्ट्रीमध्ये एक अभिनेता असा आहे की, ज्याने त्याच्या चित्रपटाच्या यशानंतर प्रसिद्ध होण्याच्या भीतीने केवळ अभिनयच नाही तर देशही सोडला.
मुंबई : बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारा कोणताही कलाकार नाव आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशानेच प्रवेश करतो. पण, इंडस्ट्रीमध्ये एक अभिनेता असा आहे की, ज्याने त्याच्या चित्रपटाच्या यशानंतर प्रसिद्ध होण्याच्या भीतीने केवळ अभिनयच नाही तर देशही सोडला. चित्रपटसृष्टीतील कुटुंबातून असूनही, त्याला प्रसिद्धीची भीती वाटत होती. त्याचे काका त्याच्या काळातील सुपरस्टार होते तर त्याचा चुलत भाऊ अजूनही बॉलिवूडमध्ये आहे.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभय देओल आहे. अभय देओल हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंबातील आहे. त्याचे काका म्हणजेच धर्मेंद्र हे 60-70 च्या दशकातील सुपरस्टार होते. ते या वयातही काम करत आहे आणि त्याचे भाऊ सनी देओल आणि बॉबी देओल देखील नायक आणि खलनायक म्हणून लोकप्रिय आहेत. सनी देओल लवकरच 'जाट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच वेळी, बॉबी देओल त्याच्या खलनायकी भूमिकेने सतत प्रसिद्धी मिळवत आहे.
advertisement
'देव डी' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सारख्या चित्रपटांमध्ये अभय देओलने काम केलं आहे त्याच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले, पण जेव्हा त्याला यश मिळाले तेव्हा तो घाबरला. त्याला अभिनय करायचा होता, पण प्रसिद्धीपासून दूर राहायचे होते. ह्युमन्स ऑफ बॉलीवूडशी बोलताना त्याने सांगितले की तो लोक त्याला ओळखतील, प्रसिद्धीच्या भीतीने तो काही काळासाठी परदेशात स्थलांतरित झाला.
advertisement
अभय देओलच्या मते, प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याला त्याच्या बालपणीच्या आठवणी येऊ लागल्या. हा तो काळ होता जेव्हा तो संवेदनशील होता आणि लक्ष वेधून घेणे त्याला आवडत नव्हते. याबद्दल बोलताना अभय देओल म्हणाला- 'मला माहित होते की देव डी हा एक प्रचंड यशस्वी चित्रपट असणार आहे. मला अभिनय करायचा होता, पण मला प्रसिद्ध व्हायचं नव्हतं. प्रसिद्धीबद्दल माझ्या मनात एक संघर्ष होता. मी नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष दिले. मी काही समस्या सोडवल्या नाहीत म्हणून मी पळून गेलो. प्रसिद्धीसोबत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मला भीती वाटत होती.
advertisement
अभय देओलने यावेळी खुलासा केला होता की देव डी च्या यशानंतर तो न्यू यॉर्कला गेला होता आणि तिथे खूप मजा केली होती. न्यूयॉर्कला गेल्यानंतर तो देव डी च्या भूमिकेत प्रत्यक्षात उतरला. तो खूप दारू पिऊ लागला आणि पैसे वाया घालवू लागला. अभिनेता म्हणाला,'मला माहित होते की मी तिथे राहणार नाही. मी नुकताच न्यू यॉर्कमध्ये 'देव.डी.' मध्ये साकारलेली भूमिका साकारत होतो. तो कोणतेही काम करत नव्हता, फक्त पैसे वाया घालवत होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 03, 2025 5:51 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
हिट चित्रपट दिले, मग स्टारडमला घाबरला अभिनेता, फेमस होण्याच्या भीतीने परदेशात गेला पळून