नको तिथे स्पर्श, दुर्गा पूजेत काजोलसोबत अश्लील वर्तन? ती व्यक्ती कोण, व्हायरल व्हिडीओमागचं सत्य
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Kajol Viral Video Truth : सिंदूर खेला दरम्यानचा काजोलचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात एक व्यक्ती काजोलला अयोग्यरित्या पकडताना दिसत आहे. काजोलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमागचं सत्य काय?
मुंबई : नवरात्री आणि मुखर्जी दुर्गा पूजा पंडाल नेहमीच चर्चेत असतो. अभिनेत्री काजोल, राणी मुखर्जी हा बहिणी या पंडालमध्ये नेहमीच उपस्थित असतात. दुर्गा पूजा म्हटल्यावर काजोल, राणी मुखर्जी यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दुर्गा पूजेच्या निमित्तानं सिंदूर खेला खेळला जातो. राणी आणि काजोल यांनी सिंदूर खेलाचा आनंद लुटला. दरम्यान या सिंदूर खेला दरम्यानचा काजोलचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात एक व्यक्ती काजोलला अयोग्यरित्या पकडताना दिसत आहे. काजोलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
बॉलीवूड अभिनेत्री काजोल नेहमीप्रमाणे या वर्षीही दुर्गा पूजा पंडालमध्ये तिच्या कुटुंबासोबत सहभागी झाली. विजयादशमीच्या निमित्ताने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काजोल मोठ्या गर्दीत पायऱ्या उतरत असताना मागे उभा असलेल्या एका माणसाने हाताने तिला अडवलं तिचा हात धरून वरती नेलं. त्याने ज्या पद्धतीने काजोलचा हात धरला ते कॅमेऱ्यात कैद झालं आहे. काजोलचा हात पकडला तेव्हा काजोलनं त्या पद्धतीनं रिअँक्शन दिली ती देखील चर्चेत आली आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्या माणसाला दोष दिला आहे तर काहींनी काजोललाच जबाबदार ठरवलं. पण काजोलचा हात पकडणारी ती व्यक्ती होती कोण?
advertisement
पंडालमध्ये अनेक सेलिब्रेटी दर्शनसाठी येत असतात. जया बच्चन,सुमोना चक्रवर्ती, प्रियांका चोप्रा, रुपाली गांगुली, आलिया भट्ट सारखे अनेक सेलिब्रेटी पंडालमध्ये येऊन गेले. काजोलने सर्वांबरोबर फोटो काढले. सिंदूर खेलाच्या वेळेसही पंडालमध्ये प्रचंड गर्दी होती. या गर्दीतही अनेक सेलिब्रेटी आले होते. काजोल सगळ्यांना अटेंड करत होती. देवीजवळ जाण्यासाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षक आणि स्वयंसेवक ठेवण्यात आले होते.
advertisement
advertisement
दरम्यान काजोल सगळ्यांना अटेंड करत होती. सतत इतके तिकडे धावपळ करत होती, सगळ्यांबरोबर सेल्फी काढत होती. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काजोलचा हात पकडणारा तो माणूस त्यांच्याच पंडालमध्ये सेवक आहे असू म्हणू शकतो. त्याला काजोलबरोबर सेल्फी काढायचा होता त्यामुळे त्याने शिड्यांवरून उतरणाऱ्या काजोलला थांबवलं. पण काजोलचं लक्ष नव्हतं. काजोलला थांबवताना त्याने काजोलचा हात धरला आणि तिला वरती घेतलं. त्यानंतर त्याने काजोलबरोबर सेल्फी क्लिक केला. काजोलने देखील त्याच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फीसाठी पोझ दिली.
advertisement
काजोल सध्या Too Much with Kajol and Twinkle या तिच्या टॉक शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 25 सप्टेंबरपासून हा शो सुरू झाला आहे. त्याबरोबर द ट्रायल: प्यार खून धोका सीझन 2 आणि प्रभू देवाच्या Maharagni: Queen of Queens" मध्येही काजोल दिसणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 9:23 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
नको तिथे स्पर्श, दुर्गा पूजेत काजोलसोबत अश्लील वर्तन? ती व्यक्ती कोण, व्हायरल व्हिडीओमागचं सत्य