Gautami Patil : 'मला आयुष्यात ही संधी कधीच मिळाली नाही', पुण्यात भावुक झाली गौतमी पाटील, पाहा VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
gautami patil in pune book festival : पुणे पुस्तक महोत्सवाला गौतमी पाटील हिला आमंत्रण देण्यात आलं आहे. गौतमी पाटील पुण्यातील पुस्तक महोत्सवाला हजेरी लावली.गौतमी पाटील या ठिकणी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई : डान्सर गौतमी पाटील ही सध्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाली आहे. गौतमी पाटील सोशल मीडियावर ट्रेंडिग लिस्टमध्ये असते. गौतमी डान्सच्या कार्यक्रमांशिवाय अनेक ठिकाणी उपस्थिती लावत असते. सध्या पुण्यात पुणे पुस्तक महोत्सवाची जोरदार चर्चा आहे. या पुस्तक महोत्सवाला गौतमी पाटील हिला आमंत्रण देण्यात आलं आहे. गौतमी पाटील पुण्यातील पुस्तक महोत्सवाला हजेरी लावली.
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. गौतमी पाटील याठिकाणी नाचणारा का असं सर्वांना वाटलं होतं. पण नेहमीच नाचणारी गौतमी यावेळी हातात पुस्तक घेऊन वाचताना दिसली. अभिनेत्री दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी गौतमी पाटीलला पुस्तक भेट दिली.
advertisement
पुणे पुस्तक महोत्सवात बोलताना गौतमी म्हणाली, "मला इतर ठिकाणी नाचायला बोलवतात पण इकडे पुस्तक वाचायला बोलावलं. पुण्यात एवढा मोठा पुस्तक महोत्सव भरला आहे मला यापुढे मोकळा वेळ मिळाला तर मी पुस्तक वाचणार आहे."
गौतमी पुढे म्हणाली, "पुस्तक महोत्सवाला आल्यामुळे मला चालना मिळेल वळण मिळेल. मला लहानपणापासून डान्स करत होते पण आता नक्की पुस्तक वाचेन. सर्वांनी पुस्तक वाचा. मला पुस्तक वाचण्याची संधी मिळाली नाही पण इथून पुढे नक्की पुस्तक वाचणार आहे."
advertisement
गौतमीने प्रवीण तरडे यांचे आभार मानले. गौतमी म्हणाली, "प्रवीण दादा सुचवलेले शिवाजी महाराज यांचे पुस्तक मी वाचणार आहे. मला प्रवीण तरडे आता पुस्तक निवडून देणार आहेत त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल आभार." तर प्रवीण तरडे म्हणाले, "मी 'फकिरा' अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक भेट देणारा आहे."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 21, 2024 5:23 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil : 'मला आयुष्यात ही संधी कधीच मिळाली नाही', पुण्यात भावुक झाली गौतमी पाटील, पाहा VIDEO