Gautami Patil New Movie: ठसकेबाज गौतमी पाटीलचा येतोय नवा सिनेमा, पुन्हा राडा करायला सज्ज!

Last Updated:

कधी कार्यक्रमात राडा, तर कधी लग्नाच्या चर्चा, वेगवेगळ्या कारणांमुळे गौतमी पाटील सतत चर्चेत असते. गौतमी लवकरच आणखी एका सिनेमात झळकणार आहे.

ठसकेबाज गौतमी पाटीलचा येतोय नवा सिनेमा
ठसकेबाज गौतमी पाटीलचा येतोय नवा सिनेमा
मुंबई: कधी कार्यक्रमात राडा, तर कधी लग्नाच्या चर्चा, वेगवेगळ्या कारणांमुळे गौतमी पाटील सतत चर्चेत असते. गौतमी लवकरच आणखी एका सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे गौतमी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. वेगवेगळ्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरेसोबत ती झळकणार आहे.
‘मूषक आख्यान’ या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी मकरंद अनासपुरे आणि गौतमी पाटील सज्ज झाले आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि मध्यवर्ती भूमिकेची धुरा मकरंद अनासपुरे यांनी सांभाळली आहे. चित्रपटात मकरंद यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. ‘मूषक आख्यान’ चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिची ठसकेबाज लावणी हे ‘मूषक आख्यान’ चित्रपटाचे विशेष आकर्षण असणार आहे.
advertisement
मकरंद अनासपुरे यांच्या नऊ भूमिका अत्यंत सहजपणे कथेत गुंफल्या आहेत. चित्रपटाचे लेखक हेमंत एदलाबादकर आहेत. छाया दिग्दर्शन सुप्रसिद्ध छायाचित्र दिग्दर्शक सुरेश देशमाने यांचे आहे. हर्षदा पोरे कल्लुरकर यांनी लिहिलेल्या गीतांना अतुल दिवे यांनी संगीतबद्ध केले आहे. गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजातील गाणी खूपच श्रवणीय झाली आहेत. देशमाने डिजी व्हिजन’द्वारे प्रस्तुत ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाची निर्मिती सुरेश पठारे, मच्छिंद्र लंके, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने यांनी केली आहे.
advertisement
‘मूषक आख्यान’ चित्रपटात सबकुछ मकरंद अनासपुरे आहेत, पण त्यांच्यासोबत भरत सावले, प्रकाश भागवत, नितीन कुलकर्णी, राजू सोनावणे, अमर सोनावणे, स्वाती देशमुख, रुचिरा जाधव यांच्या लक्षणीय भूमिका आहेत. पोस्ट प्रॉडक्शन रश मिडिया,अन्वय उत्तम नायकोडी, रंगभूषा- कुंदन दिवेकर, वेशभूषा- माधुरी मोरे यांचे आहे. या चित्रपटात अर्क चित्रांचा अत्यंत खुबीने वापर करण्यात आला आहे आणि ही अर्क चित्रे नागपूरचे व्यंगचित्रकार उमेश चारोळे यांनी केली आहेत
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil New Movie: ठसकेबाज गौतमी पाटीलचा येतोय नवा सिनेमा, पुन्हा राडा करायला सज्ज!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement