Gautami Patil: आता TVवर झळकणार गौतमी पाटील, पण कोणत्या मालिकेत? पाहा प्रोमो VIDEO

Last Updated:

डान्सर गौतमी पाटीलला वेगळ्या ओळखीची गरज नाही. आपल्या अदांनी आणि डान्सने ती प्रेक्षकांना घायाळ करत असते. ती सतत चर्चेत असते. आता गौतमी टीव्हीवरील कार्यक्रमात झळकणार आहे.

आता TVवर झळकणार गौतमी पाटील
आता TVवर झळकणार गौतमी पाटील
मुंबई :  डान्सर गौतमी पाटीलला वेगळ्या ओळखीची गरज नाही. आपल्या अदांनी आणि डान्सने ती प्रेक्षकांना घायाळ करत असते. ती सतत चर्चेत असते. आता गौतमी टीव्हीवरील कार्यक्रमात झळकणार आहे. पण कोणत्या कार्यक्रमात ती प्रेक्षकांना दिसणार? याविषयी अधिक जाणून घेऊया.
गौतमी पाटीलचा नवा प्रोमो व्हिडीओ समोर आलाय. गौतमी स्टार प्रवाह वाहिनीवर दिसणार आहे. पण काय निीमित्त आहे? याविषयी जाणून घेऊया. आता होऊ दे धिंगाणा शो लवकरच 100 भाग पूर्ण करणार आहे. याच निमित्ताने गौतमीचा खास परफॉर्मन्स पहायला मिळणार आहे.
advertisement
दर्जेदार मालिका आणि नवनव्या रिॲलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजनासाठी ही मेजवाणी स्टार प्रवाह वाहिनी आणत असते. या वाहिनीवरीललोकप्रिय कार्यक्रम आता होऊ दे धिंगाणा लवकरच 100 भाग पूर्ण करणार आहे. पहिल्या पर्वापासून आता होऊ दे धिंगाणाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधवचं खुमासदार सूत्रसंचालन आणि प्रवाह परिवाराचा सळसळता उत्साह हे या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने वेगळेपण.
advertisement














View this post on Instagram
























A post shared by Star Pravah (@star_pravah)



advertisement
100 भागांच्या या प्रवासात या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मनोरंजनाचा हा प्रवास असाच अखंड रहाणार आहे. शंभराव्या भागाच्या खास सेलिब्रेशनमध्ये प्रवाह परिवारासोबतच गौतमी पाटील, धनंजय पोवार आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर देखिल सामील होणार आहेत. तेव्हा पाहायला विसरु नका आता होऊ दे धिंगाणा शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil: आता TVवर झळकणार गौतमी पाटील, पण कोणत्या मालिकेत? पाहा प्रोमो VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement