Gautami Patil: राम कृष्ण हरी; गौतमी पाटीलचा नवा व्हिडीओ, केली माय माऊलींची सेवा, VIDEO व्हायरल
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Gautami Patil: आपल्या सौदर्याने, डान्सने आणि कातिल अदांनी सर्वांना भुरळ घालणारी गौतमी पाटील. ती सतत चर्चेत असते.
मुंबई : आपल्या सौदर्याने, डान्सने आणि कातिल अदांनी सर्वांना भुरळ घालणारी गौतमी पाटील. ती सतत चर्चेत असते. डान्स असो किंवा सिनेमातील आयटम सॉंग आजकाल गौतमी सतत प्रकाश झोतात आहे. सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय असते. अशातच गौतमीचा एक नवा व्हिडीओ समोर आलाय. ज्यामुळे तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
गौतमी पाटील व्हिडाओ
गौतमी पाटीलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये ती भक्ती तल्लीन झालेली दिसतेय. वारकऱ्यांसोबच वेळ घालवत, त्यांना खाऊ देत, टाळ वाजवत, देवाजी पूजा करताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
advertisement
व्हिडीओ शेअर करत गौतंमीने लिहिलं, 'राम कृष्ण हरी, माय माऊलींची सेवा.' पोस्टवर भरभरुन लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव पहायला मिळत आहे. अनेकांनी तिचं कौतुक केलं.
advertisement
दरम्यान, गौतमी पाटील आता केवळ नृत्यांगणा राहिलेली नाही. ती रुपेरी पडद्यावरही दिसतेय. तिनं अनेक सिनेमात अभिनयाचीही छाप सोडली आहे. रिअॅलिटी शोमध्येही हजेरी लावली आहे. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत चालली आहे. कठिण परिस्थितीन, प्रचंड मेहनतीनं ती आज इथे येऊन पोहोचली आहे. तिचा मोठा चाहतावर्गही आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 22, 2025 3:45 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil: राम कृष्ण हरी; गौतमी पाटीलचा नवा व्हिडीओ, केली माय माऊलींची सेवा, VIDEO व्हायरल