काय आहे हीरामंडीतील अदिती राव हैदरीची 'गजगामिनी चाल'? केलाय सोशल मीडियावर हंगामा

Last Updated:

'सैयां हटो जाओ' या गाण्यावर ठुमकदारपणे चालणाऱ्या अदिती राव हैदरीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अदितीच्या या चालण्याचे अनेकांनी अनेक अर्थ लावले आहेत. पण त्या चालीचा नेमका आणि अर्थपूर्ण अर्थ जाणून घ्या.

हीरामंडी-अदिती राव हैदरी
हीरामंडी-अदिती राव हैदरी
मुंबई : संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी ही वेब सीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. हीरामंडी मधील सगळ्यांच गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्रींचे ड्रेस, त्यांची ज्वेलरी, सीरिजमधील क्लासिकल गाणी असोत किंवा भन्साळींचा भव्य दिव्य सेट सगळ्याच गोष्टींची चर्चा होतेय. सिनेमातील काही सीन्स देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यातील एक सीन म्हणजे जो अभिनेत्री अदिती राव हैदरी हिच्यावर चित्रीत करण्यात आला आहे. 'सैयां हटो जाओ' या गाण्यावर ठुमकदारपणे चालणाऱ्या अदिती राव हैदरीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अदितीच्या या चालण्याचे अनेकांनी अनेक अर्थ लावले आहेत. अदितीची तुलना अभिनेत्री मधुबालाबरोबर करण्यात आली आहे. नेमकं या चालण्याला काय म्हणतात? पाहूयात.
अभिनेत्री अदिती राव हैदरी हिनं हीरामंडीमध्ये बिब्बो जानची भुमिका साकारली आहे. 'सैयां हटो जाओ' या गाण्यावर अदिती मुजरा करताना दिसते. या गाण्यात अदिती कॅमेऱ्याकडे पाठ कडून वॉक करताना दिसतेय. याला गजगामिनी वॉक असं म्हणतात. बिब्बो जानच्या या वॉकवर चाहते फिदा झालेत. याआधीही बॉलिवूडमध्ये मधुबाला आणि माधुरी दीक्षित यांनी गजगामिनी चाल केली आहे. पण अदिती राव त्यांच्यात वरचढ ठरली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार,संस्कृतमध्ये गजगामिनीचा अर्थ हत्तीची चाल. म्हणजेच हत्ती किंवा हत्तीसारखे चालणे, हलणे आणि शांतपणे डोलत चालणं. कथ्थक या भारतीय शास्त्रीय नृत्यात गजगामिनी चालीला विशेष महत्त्व आहे. कथ्थक नृत्य शिकणाऱ्या प्रत्येकाला गजगामिनीची चाल शिकवली जाते. यालाच गजगामिनी गत देखील म्हणतात.
advertisement
अभिनेत्री अदिती राव हैदरी ही कथ्थक नृत्यांगणा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची तिला आधीपासूनच जाणं आहे. त्यामुळे अदितीनं गजगामिनीची चाल अत्यंत सुंदरपणे केलेली पाहायला मिळते.
advertisement
अदिती राव हैदरीच्या आधी अभिनेत्री मधुबाला हिनं मुघल ए आजम सिनेमातील मोहे पनघट पे या गाण्यात गजगामिनी चाल केली होती. अदिती राव हैदरी आणि मधुबालाच्या गजगामिनी चालीची तुलना सोशल मीडियावर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री माधुरी दीक्षितनं देखील एका गाण्यात गजगामिनी वॉक केल्याचं पाहायला मिळतं.
मराठी बातम्या/मनोरंजन/
काय आहे हीरामंडीतील अदिती राव हैदरीची 'गजगामिनी चाल'? केलाय सोशल मीडियावर हंगामा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement