हेमा मालिनीकडून फुकट करुन घेतला चित्रपट, एक रुपयाही दिला नाही; रिलीज होताच झाला फ्लॉप
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Hema Malini Movie : ज्याकाळी हेमा मालिनी बक्कळ मानधनावर काम करत होत्या तेव्हा त्यांनी असा एक सिनेमा केला ज्यात त्यांनी एक रुपयाही मानधन घेतलं नाही. तो सिनेमा कोणता.
हेमा मालिनीने वेगवेगळ्या भूमिका आतापर्यंत केल्या आहेत. त्या भूमिका चाहत्यांच्या अजूनही आठवणीत आहेत. सर्वांनाच माहिती आहे हेमा मालिनी या बॉलिवूडमध्ये 'ड्रीम गर्ल' नावाने फेमस आहे. तिने आपला अभिनयाचा प्रवास हा 1970 पासून सुरु केला होता. हेमा मालिनीने एक चित्रपट असाही केला होता, ज्या चित्रपटाचे तिने एक रुपयाही मानधन घेतलं नव्हतं. श्रीदेवीने एक रुपयाही मानधन घेतलं नाही पण रिलीज होताच हा सिनेमा फ्लॉप ठरला.
ज्याकाळी हेमा मालिनी बक्कळ मानधनावर काम करत होत्या तेव्हा त्यांनी एक चित्रपट कमी मानधनावर केला होता. त्या चित्रपटाचे नाव होते 'मीरा'. त्याचे दिग्दर्शन करत होते गुलजार आणि प्रेमजी हे प्रोड्युस करत होते. ते खूप वेळ तिच्या सोबच चित्रपट करण्यासाठी वाट पाहत होते.
advertisement
प्रेमजीना प्रत्येक वेळेस हेमा मालिनी या नकार द्यायच्या. तिने सांगितले होते की, तुम्ही जर पौराणिक काही किंवा मीरावरती चित्रपट केलात तर मी नक्की त्या चित्रपटात काम करेन. तिच्या सांगण्यावरुनच त्यांनी मीरा चित्रपट बनवायला घेतला. या चित्रपटात हेमाच्या विरुध्द विनोद खन्नाला दाखवले होते. या चित्रपटासाठी निर्मात्यांना नायकाला निवडने हे एक आव्हान बनले होते.
advertisement
या चित्रपटावर काम करायला घेतल्यावर प्रेमजी एका महत्वाच्या गोष्टीवर येऊन अडकले. ते म्हणते चित्रपटाचे बजेट. हेमा मालिनी यांना जेव्हा समजले तेव्हा त्यांनी प्रेमजीना म्हणाल्या, "हा चित्रपट मी भगवान कृष्णांच्या भक्ती प्रती प्रेम, आस्था आणि श्रध्देसाठी करणार आहे. मी तुमच्याकडून मानधन घेणार नाही. तुम्ही श्रध्देने जे काही द्याल ते घेईन." निर्मात्यांना वाटले की हा चित्रपट चालेल. चित्रपटवर खर्चही खूप केला होता. परंतू 'मीरा' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.
advertisement

चार दशकाच्या करियरमध्ये हेमा मालिनी यांनी 150 चित्रपट केले. आपल्या करियरमध्ये त्यांनी 'सीता और गीता', 'प्रेम नगर', 'अमीर गरीब', 'शोले', 'महबूबा', 'चरस' और 'ड्रीम गर्ल' या चित्रपटांमध्ये काम केले होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 10:16 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
हेमा मालिनीकडून फुकट करुन घेतला चित्रपट, एक रुपयाही दिला नाही; रिलीज होताच झाला फ्लॉप


