Dada Kondke Name Secret : कृष्णा कोंडके कसे झाले दादा कोंडके? अभिनेत्याच्या आयुष्यातील हा अजब किस्सा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
दादा कोंडके हे नाव ऐकल्यानंतर नकळत एक हसू प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येतं. पण कधी विचार केलाय का कृष्णा हे सुंदर नाव असताना त्यांचा दादा म्हणून का हाक मारली जायची.
मुंबई, 31 ऑगस्ट : मराठी इंडस्ट्रीला विनोदी सिनेमांचा सुवर्णकाळ दाखवणाऱ्या, मराठी मातीतील अस्सल गावरान सिनेमातून रांगडा नायक लोकप्रिय अभिनेते दादा कोंडके. दादा कोंडके यांची नुकतीच 91वी जयंती साजरी झाली. कृष्णा कोंडके म्हणून जन्माला आलेल्या या अवलियानं दादा कोंडके म्हणून आपलं नाव कमावलं. दादा कोंडकेंनी आपल्या सगळ्या सिनेमातून प्रेक्षकांना नेहमीच खळखळवून हसवलं. त्यांचा असा एकही सिनेमा नाही जो पाहून प्रेक्षक कंटाळले असतील. आजही त्यांचे सिनेमे तितक्याच आवडीने पाहिले जातात. दादा कोंडके हे नाव ऐकल्यानंतर नकळत एक हसू प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येतं. पण कधी विचार केलाय का कृष्णा हे सुंदर नाव असताना त्यांचा दादा म्हणून का हाक मारली जायची. दादा कोंडकेंच्या नावामागे देखील एक रंजक कथा आहे. काय आहे कृष्णा कोंडके यांचा दादा कोंडके होण्याचा प्रवास? पाहूयात.
दादा कोंडके यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईतल्या नायगाव येथे झाले. ते जन्मले तो दिवस कृष्णाष्टमीचा होता. इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या सणाच्या दिवशी मुलगा झाल्याने आई-वडिलांनी सहाजिक त्यांचं नाव कृष्णा ठेवलं. पण या नावाने त्यांना ना आई वडीलांनी कधी हाक मारली ना त्यांच्या चाहत्यांनी. दादांचा जन्म झाला तेव्हापासून त्यांची शरीरयष्टी किरकोळ होती. दिवस उजाडला की काही ना काही कारणाने हा छोटा कृष्णा आजारी पडायचा. दादांच्या भावाचं आरोग्यही फार काही चांगले नव्हते.
advertisement
हेही वाचा - Dada Kondke : दादा कोंडकेंनी 16 सिनेमांची निर्मिती केली, सगळे सुपरहिट; सिल्व्हर ज्युबली सिनेमांचं रहस्य काय?
दादा सतत आजारी असल्याने त्यांची आई नेहमीच काळजीत असायची. त्यांचे वडील गिरणी कामगार. घरची परिस्थितीही तशी नाजूक होती. दादांच्या गिरणी कामगार असलेल्या वडीलांनाही काही सुचेना. मग कुणीतरी त्यांना सांगितले की मुलाला नावाने हाक मारू नका, त्याला तात्या, सोन्या, दादा, आण्णा असं काहीतरी नाव द्या. मुलाच्या काळजीपोटी मग कृष्णाच्या ऐवजी दादा अशी हाक मारली जाऊ लागली आणि हेच नाव त्यांच्यासोबत आयुष्यभर राहिलं.
advertisement
दादा कोंडके यांचं नायगावात दादांचं बालपण गेलं. वाद्याची आवड होती, त्यातूनच एका बँड पथकात दादांची कलाकारी बहरली. त्यानंतर राष्ट्रसेवादलाशी संपर्क आला आणि त्यातून त्यांना अभिनय, गाणं या कलेचा सूर सापडला. पुढे भालजी पेंढारकर यांनी दादांमधील अभिनय गुण ओळखले आणि त्यांना 'तांबडी माती' या सिनेमात भूमिका करण्याची संधी दिली. हा सिनेमा फार चालला नाही पण दादांना अभिनयाची नस सापडली. दादांनी स्वतः सोंगाड्या या सिनेमाची निर्मिती केली आणि त्यानंतर दादा कोंडके आणि सिनेमाचा रौप्य महोत्सव हे समीकरण कायमचं जोडले गेलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 31, 2023 5:02 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dada Kondke Name Secret : कृष्णा कोंडके कसे झाले दादा कोंडके? अभिनेत्याच्या आयुष्यातील हा अजब किस्सा








