advertisement

कॉन्सर्ट ते थेट देवदर्शन! मलायका अरोरा पुन्हा एकदा प्रेमात? मिस्ट्री मॅनसोबत गाठलं राजस्थानचं पवित्र मंदिर, VIDEO VIRAL

Last Updated:

Malaika Arora Love Life: नुकतंच मलायकाचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये ती तिच्या मिस्ट्री मॅनसोबत राजस्थानमधील एक मंदिरात दिसून आली.

News18
News18
मुंबई : बॉलिवूडमधील बोल्ड अँड ब्यूटिफूल अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली. मा६, अवघ्या काही वर्षांमध्ये त्यांच्यात दुरावा आला आणि त्यांचं हे गोड नातं संपलं. या चर्चा थांबत नाही, तोच आता मलायका अरोरा तिच्या नव्या मिस्ट्री मॅनसोबत सतत स्पॉट होत आहे. नुकतंच मलायकाचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये ती तिच्या मिस्ट्री मॅनसोबत राजस्थानमधील एक मंदिरात दिसून आली.
मलायका आणि तिचा मिस्ट्री मॅन हर्ष मेहता या दोघांना राजस्थानाच्या पाली जिल्ह्यातील नरलाई गावातील ऐतिहासिक आदिनाथ जैन मंदिरात स्पॉट करण्यात आलं. नेहमी मॉर्डन अवतारात दिसणारी मलायका यावेळी पांढऱ्या सलवार-सूटमध्ये अतिशय साध्या पण सुंदर रूपात दिसली. विशेष म्हणजे, तिच्यासोबत तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड हर्ष मेहता तिच्यासोबत सावलीसारखा उभा आहे. हर्षने यावेळी काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. दोघांनीही मंदिरात शांतपणे पूजा केली आणि तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांसोबत फोटोही काढले.
advertisement

कॉन्सर्ट ते थेट मंदिर असा मलायका-हर्ष यांचा प्रवास 

मलायका आणि हर्ष यांना पहिल्यांदा इंटरनॅशनल सिंगर एनरिक इग्लेसियसच्या मुंबईमधील कॉन्सर्टमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. तिथली त्यांची केमिस्ट्री पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हापासूनच दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, त्यानंतर अनेकवेळा त्यांना एकत्र स्पॉट केलं गेलं. दरम्यान, कॉन्सर्टपासून सुरू झालेला मलायका-हर्ष यांचा प्रवास आता मंदिरापर्यंत येऊन पोहोचला आहे. राजस्थानच्या मंदिरात एकत्र दर्शनाला जाणं, हे केवळ मैत्री आहे की लग्नाच्या दिशेने पडलेलं पाऊल? असा सवाल आता नेटकरी विचारत आहेत.
advertisement
advertisement
तथापि, आपल्या डेटिंग लाइफबद्दल मलायकाने याआधीही स्पष्टीकरण दिलं होतं. तिने म्हटलं होतं की, अशा चर्चांमुळे आता तिला फारसा फरक पडत नाही. ती म्हणाली होती, "लोक काय बोलतात याकडे मी दुर्लक्ष करते. उलट माझा मुलगा अरहान अशा बातम्या ऐकल्यानंतर हसतो आणि मला चिडवतो." मलायकाने या नात्याला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी, हर्ष मेहतासोबतची तिची वाढती जवळीक काहीतरी वेगळंच सांगून जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
कॉन्सर्ट ते थेट देवदर्शन! मलायका अरोरा पुन्हा एकदा प्रेमात? मिस्ट्री मॅनसोबत गाठलं राजस्थानचं पवित्र मंदिर, VIDEO VIRAL
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement