Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या आईचं निधन, 13 दिवस ICU मध्ये सुरु होते उपचार
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Jacqueline Fernandez Mother Death:बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तिच्या आईचं किम फर्नांडिस यांचं रविवारी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत होत्या. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
24 मार्च रोजी किम फर्नांडिस यांना अचानक स्ट्रोक आला होता, त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. जॅकलिनला ही बातमी कळताच ती आपलं शूटिंग थांबवून तातडीनं मुंबईत परत आली होती आणि तिच्या आईजवळ होती.
advertisement
किम फर्नांडिस या नेहमीच ग्लॅमरपासून दूर राहिल्या. पण जॅकलिनच्या करिअरमध्ये त्यांचा मोठा आधार होता. मुलीच्या प्रत्येक निर्णयात त्यांनी साथ दिली होती. त्यांच्या निधनामुळे जॅकलिन खूपच भावनिक झाली आहे.
कुटुंबीयांनी सांगितले की, किम फर्नांडिस यांचे अंतिम संस्कार खाजगी पद्धतीने करण्यात येणार आहेत. फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्रच उपस्थित राहतील. जॅकलिनच्या टीमकडून अद्याप कोणतंही अधिकृत स्टेटमेंट देण्यात आलेलं नाही.
advertisement
चित्रपटसृष्टी अजूनही ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाच्या दुःखातून सावरलेली नाही. अशातच जॅकलिनच्या घरातून आलेल्या दुःखद बातमीमुळे चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 06, 2025 1:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या आईचं निधन, 13 दिवस ICU मध्ये सुरु होते उपचार